आठवड्याचे भविष्य – 3 मार्च ते 9मार्च 2019

>> नीलिमा प्रधान

मेष – व्यावहारिक दृष्टिकोन बाळगा
सूर्य-नेपच्यून युती, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. तुमच्या प्रत्येक कार्यातील कठीण प्रश्न सोडवता येईल. नव्या व्यक्तीच्या बुद्धीचा व तंत्रज्ञानाचा वापर करा. डावपेच टाका. उद्योग-धंद्यात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. सावध रहा. नोकरीत वर्चस्व राहील. कुटुंबातील व्यक्तींची प्रगती समाधान देईल. शुभ दिनांक ः 3, 4.

वृषभ – योजना मार्गी लागतील
चंद्र-गुरू लाभयोग, चंद्र-बुध प्रतियुती होत आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात सहभाग प्रभावी ठरेल. उद्योगधंद्यास अधिक व्यापक स्वरूप देता येईल. कर्जाचे काम मार्गी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा बदल करू शकाल. रेंगाळत राहिलेली योजना मार्गी लावता येईल. खरेदी करता येईल. शुभ दिनांक ः 4, 5.

मिथुन – प्रगतीची संधी मिळेल
सूर्य-नेपच्यून युती, सूर्य-शनी लाभयोग होत आहे. नोकरीत महत्त्वाची बातमी तुम्हाला मिळेल. वरिष्ठ तुम्हाला बढती देण्याचे ठरवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठय़ा व्यक्तीच्या सल्ल्याने तुमचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करा. बुद्धिमत्तेचा उपयोग करता येईल. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. शुभ दिनांक ः 6, 7.

कर्क – निर्णयात सावधगिरी बाळगा
चंद्र-बुध युती, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. व्यवसायातील समस्या कमी होईल. मोठे कंत्राट मिळवता येईल. प्रयत्न सुरू ठेवा. थकबाकी वसूल होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात सावधपणे निर्णय घ्या. लोकप्रियतेत वाढ होईल. कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या विचारांना विरोध करू नका. परिस्थिती बदलेल. शुभ दिनांक ः 3, 4.

सिंह – द्विधा मनःस्थिती होईल
चंद्र-मंगळ केंद्रयोग, सूर्य-शनी लाभयोग होत आहे. एखादी लाभदायक योजना तुमच्या पुढे ठेवली जाईल. व्यवसायात मोहाचे क्षण येतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. करार करण्यापेक्षा तात्पुरता विचार करा. सामाजिक क्षेत्रात निर्णयासाठी दबाव येईल. मनाची स्थिती द्विधा होईल. शुभ दिनांक ः 5, 6.

कन्या – विचारपूर्वक कृती करा
चंद्र-गुरू लाभयोग, चंद्र-मंगळ केंद्रयोग होत आहे. संततीच्या प्रगतीची बातमी मिळेल. व्यवसायात तुम्हाला विचारपूर्वक अंदाज घ्यावा लागेल. नोकरीत वरिष्ठांच्या संमतीने महत्त्वाचा निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला विरोध होईल. राग वाढेल. कोर्ट केसमध्ये अडचणी येतील. शुभ दिनांक ः 3, 4.

तूळ – खरेदीचा योग
सूर्य-नेपच्यून युती, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. थोरामोठय़ांच्या ओळखीने मोठे काम मिळवा. राजकीय-सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या सहवासात राहाल. जिद्दीने नोकरीसाठी प्रयत्न करा. वास्तू, जमीन, वाहन खरेदी करता येईल. आत्मविश्वासाने प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल. वस्तुस्थिती समजून घ्या. शुभ दिनांक ः 5, 6.

वृश्चिक – प्रगतीकारक काळ
चंद्र-बुध युती, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. प्रत्येक दिवस प्रगतीकारक ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात लोकांच्या सुख-दुःखाचा विचार करा. व्यवसायात यश मिळेल. कुटुंबातील व्यक्तींना खूश ठेवाल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत कौतुकदायी काम कराल. नवीन परिचय प्रेरणादायी ठरतील. शुभ दिनांक ः 3, 4.

धनु- प्रतिष्ठा वाढेल
सूर्य-नेपच्यून युती, चंद्र-प्लुटो लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात स्वतःच्या अनुभवांना महत्त्व द्या. तुमची प्रतिष्ठा वाढेल. दौऱयात यश व प्रसिद्धी मिळेल. विरोधाला प्रेमाने सामोरे जा. व्यवसायाला नवे वळण देता येईल. वरिष्ठांकडून महत्त्वाचे काम करून घ्या. नावलौकिक मिळेल. शुभ दिनांक ः 4, 5.

मकर – शुभकारक घटना घडतील
चंद्र-बुध युती, चंद्र-गुरू त्रिकोणयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात जवळच्या लोकांचा उत्साह तुम्हाला प्रेरणा देणारा ठरेल. प्रसिद्धी मिळेल. लोकांच्या समस्या सोडवता येतील. योजना गतिमान होईल. मानसन्मान मिळेल. उद्योग-व्यवसायात मोठी संधी मिळेल. नोकरीत फायदेशीर बदल करण्याची संधी मिळेल. शुभ दिनांक ः 7, 8.

कुंभ – धाडसी कामगिरी कराल
सूर्य-नेपच्यून युती, सूर्य-शनी लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची भेट घ्या. चर्चा करून निर्णय घेता येईल. नोकरीत बदल चांगला ठरेल. नाटय़-चित्रपट, क्रीडा क्षेत्रांत धाडसी कामगिरी होईल. दिग्गज लोकांचा सहवास प्रेरणा देणारा ठरेल. व्यवसायातील कामे होतील, परंतु व्यवहाराकडे लक्ष द्या. शुभ दिनांक ः 8, 9.

मीन – प्रसंगावधान राखा
चंद्र-बुध युती, चंद्र-शुक्र लाभयोग होत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. प्रगतीची संधी पुढे येणार आहे. जनहितासाठी कार्य करा. उद्योगधंद्यात दादागिरीची भाषा वापरू नका. कायद्याचे बंधन ठेवा. थकबाकी मिळवा. खरेदीची संधी लाभेल. कलाक्षेत्रांत प्रगती होईल. शुभ दिनांक ः 3, 4.

आपली प्रतिक्रिया द्या