
>> नीलिमा प्रधान
मेष – चर्चा सफल होईल
मेषेच्या दशमेशात सूर्य राश्यांतर, बुध-गुरू युती होत आहे. कोणत्याही कार्याला संपन्न करणारे ग्रहमान आहे. रविवारी रागावर नियंत्रण ठेवा. प्रतिष्ठा आणि लोकप्रियतेत भर पडणारी घटना घडेल. चर्चा सफल होईल. प्रेमाला चालना मिळेल. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.
शुभ दिनांक ः 14, 16
वृषभ – तणाव निर्माण होईल
वृषभेच्या भाग्येशात सूर्य राश्यांतर, बुध-शनी युती होत आहे. सप्ताहाच्या आरंभात तणाव, चिंता निर्माण होईल. संक्रांतीपासून कार्याला वेग येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घेऊन परिस्थितीचे अवलोकन करा. म्हणजे पुढील डावपेच अधिक चांगले टाकता येतील.
शुभ दिनांक ः 14, 16
मिथुन – परीक्षेचा काळ
मिथुनेच्या अष्टमेशात सूर्य राश्यांतर, शुक्र-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. चुकीचे वक्तव्य योग्य ठरणार नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परीक्षेचा काळ आहे. नोकरी टिकवा. आध्यात्मिक क्षेत्रात मन रमेल.
शुभ दिनांक ः 11, 16
कर्क – खाण्याची काळजी घ्या
कर्केच्या सप्तमेशात सूर्य राश्यांतर, बुध-शनी युती होत आहे. भागीदारी आणि मैत्रीत आठवडय़ाच्या सुरुवातीला गैरसमज होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढला तरी तुमचे चातुर्य दिसेल. कुटुंबात एखादी गोष्ट तुमच्यापासून लपवली जाऊ शकते. खाण्याची काळजी घ्या.
शुभ दिनांक ः 10, 11
सिंह – तडजोड करावी लागेल
सिंहेच्या षष्ठेशात सूर्य राश्यांतर, शुक्र-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. महत्त्वाची कामे, चर्चा आठवडय़ाच्या सुरुवातीला करा. वसुली करण्याचा प्रयत्न करा. वरिष्ठांच्या मनात तुमच्याबद्दल विष पेरण्याचा प्रयत्न होईल. चित्रपट, कला, साहित्य क्षेत्रात तडजोड करावी लागेल.
शुभ दिनांक ः 11, 16
कन्या – अधिकारात वाढ
कन्येच्या पंचमेशात सूर्य राश्यांतर, बुध-गुरू युती होत आहे. कार्याला गती मिळेल. अडचणी दूर करता येतील. अधिकारात वाढ होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीसंबंधी बातमी मिळेल. शिक्षणात विद्यार्थी वर्गाने मेहनत घ्यावी. शनिवारी वाहन हळू चालवा.
शुभ दिनांक ः 10, 14
तूळ – आप्तेष्टांच्या भेटी
तुळेच्या सुखेशात सूर्य राश्यांतर, शुक्र-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विधान करताना तारतम्य ठेवा. बोललेला शब्द मागे घेता येत नाही. प्रवासात कायदा पाळा. आप्तेष्टांच्या भेटी होतील. करारावर सही करताना कागद नीट वाचा.
शुभ दिनांक ः 10, 11
वृश्चिक – वेगाने पुढे जाल
वृश्चिकेच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, बुध-गुरू युती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, तुमच्या कार्याला चांगले वळण मिळेल. वेगाने पुढे जाल. नवे पद मिळेल. कुटुंबातील समस्या कमी होतील. जीवनातील स्वप्न पूर्ण करा. व्यवसायात जम बसेल. वसुली करा.
शुभ दिनांक ः 11, 14
धनु – कर्जाचे काम होईल
धनुच्या धनेशात सूर्य राश्यांतर, बुध-गुरू युती होत आहे. प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. भेट घ्या, चर्चा करून समस्या सोडवा. लोकजागरण यशस्वी होईल. कर्जाचे काम होईल. कंत्राट मिळवा. वाहन, घर खरेदी करता येईल. कुटुंबात सुखद समाचार मिळेल.
शुभ दिनांक ः 14, 16
मकर – राग वाढेल
स्वराशीत सूर्य राश्यांतर, बुध-गुरू युती होत आहे. संक्रांतीनंतर प्रत्येक कार्याचा विस्तार करता येईल. अति गोड बोलणाऱयांपासून सावध रहा. समोरची व्यक्ती शब्द पाळणार नाही. तुमचा राग वाढेल. नोकरीत वर्चस्व वाढेल. मैत्रीत मात्र तणाव होईल. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक ः 14, 16
कुंभ – तटस्थ धोरण ठेवा
कुंभेच्या व्ययेशात सूर्य राश्यांतर, शुक्र-हर्षल त्रिकोणयोग होत आहे. तुम्ही मैत्रीच्या भावनेतून वागाल, परंतु समोरची व्यक्ती त्याचा कसा अर्थ लावील हे समजणे कठीण आहे. तटस्थ धोरण ठेवा. आपल्यावर टीका कमी कशी होईल ते पहा. कला, क्रीडा, साहित्य आणि शिक्षणात तडजोड करावी लागेल.
शुभ दिनांक ः 10, 11
मीन – नवे पद मिळेल
मीनेच्या एकादशात सूर्य राश्यांतर, बुध-शनी युती होत आहे. प्रत्येक दिवस यशाचा ठरवा. मेहनत घ्या. प्रकरण संयमाने हाताळा. नवे पद मिळेल. नवीन परिचय प्रेरणादायी ठरेल. बढतीची शक्यता दिसेल. प्रसिद्धी, पैसा मिळेल. रेंगाळलेली कामे करून घ्या.
शुभ दिनांक ः 10, 11म