साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 9 ते शनिवार 15 मे 2021

>> नीलिमा प्रधान

मेष -डावपेचांना यश मिळेल
मेषेच्या धनेशात सूर्य राश्यांतर चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. व्यवसायात फायदा होईल. कायद्याच्या विरोधात जाऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या डावपेचांना यश मिळेल. विरोधक तुमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतील. चित्रपट, साहित्यात आघाडीवर राहाल. शुभ दिनांक ः 13, 14

वृषभ – कामाचा व्याप वाढेल
स्वराशीत सूर्य राश्यांतर, चंद्र, शुक्र युती होत आहे. व्यवसायातील वाद वाढवू नका. नवीन परिचयातून काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नम्रता ठेवा. नोकरीत कामाचा व्याप राहील. इतरांनी केलेल्या चुका सुधाराव्या लागतील. अनुभवी व्यक्तीला कमी लेखू नका. स्पर्धेत टिकून राहणे महत्त्वाचे ठरेल. शुभ दिनांक ः 14, 15

मिथुन -संयम राखा
मिथुनेच्या व्ययेषात सूर्य राश्यांतर, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. रागाचा पारा न वाढवता संयम राखा. कुठेही कायदा मोडू नका. नवीन परिचयावर जास्त विश्वास ठेऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या. व्यवसायात सावध भूमिका असू द्या. शुभ दिनांक ः 15

कर्क- कामाचे काwतुक होईल
कर्केच्या एकादशात सूर्य राश्यांतर बुध शनी त्रिकोणयोग होत आहे. उद्योगधंद्यात काम मिळेल. दगदग, धावपळ करताना सावध राहा. वरिष्ठांना कमी लेखू नका. नोकरीत तुमच्या कामाचे काwतुक होईल. कोणतेही काम कायद्याला धरून करा. चित्रपट, कला क्षेत्रात विशेष मन रमेल. प्रगती कराल. शुभ दिनांक ः 13, 14

सिंह -कार्याला वेग येईल
सिंहेच्या दशमेशात सूर्य राश्यांतर, सूर्य नेपच्युन लाभयोग होत आहे. क्षुल्लक तणाव जाणवेल परंतु त्यानंतर कार्याला वेग येईल. परिचयातून फायदेशीर योजना मिळेल. थकबाकी वसूल करा. चित्रपट, कला, साहित्यात प्रेरणादायी घटना घडेल. किचकट कामे लवकर आटपा. शुभ दिनांक ः 13, 14

कन्या – उद्योगधंद्यात सुधारणा होईल
कन्येच्या भाग्येशात सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र युती होत आहे. वादग्रस्त विधान टाळा. उद्योगधंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांच्या प्रभावाखाली राहून टीका करू नका. नोकरीत कामासंदर्भात बदल होईल. नवीन परिचयातून तुमचा उत्साह वाढेल. शुभ दिनांक ः 14, 15

तूळ – तडजोड करावी लागेल
तुळेच्या अष्टमेषात सूर्य राश्यांतर, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. संमिश्र स्वरूपाच्या घटना तुमच्या क्षेत्रात घडतील. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. कायद्याला कमी लेखू नका. उद्योधंद्यात तडजोड करावी लागेल. मानसिक दडपण येईल. नवीन ओळख फसवी ठरेल. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक ः 15

वृश्चिक – रागावर नियंत्रण ठेवा
वृश्चिकेच्या सप्तमेशात सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र युती होत आहे. गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात घाई करू नका. व्यवसायात नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. नोकरीतील महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करा. शुभ दिनांक ः 13, 14

धनु – विरोधकांना शह द्याल
धनुच्या षष्ठsशात सूर्य राश्यांतर, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. उद्योग व्यवसायात गोड बोलून व्यवहार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात समस्या निर्माण होईल. विरोधकांना शह देता येईल. नोकरीतील कठीण कामे करून घ्या. मैत्रीत गैरसमज होतील. अतिपरिचयात अवज्ञा हे लक्षात ठेवा. शुभ दिनांक ः 15

मकर – जबाबदारी स्वीकारावी लागेल
मकरेच्या पंचमेशात सूर्य राश्यांतर, सूर्य नेपच्यून लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील रेंगाळलेली कामे करण्यास सुरुवात करा. व्यवसायात सुधारणा होईल. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. कुटुंबातील तणाव कमी होईल. चित्रपट, कलासाहित्यात यश लाभेल. लोकप्रियता वाढेल. शुभ दिनांक ः 13, 14

कुंभ – अनाठायी गुंतवणूक नको
कुंभेच्या सुखस्थानात सूर्य राश्यांतर, चंद्र, मंगळ लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात महत्त्वाची कामे करताना कायद्याच्या चौकटीत राहा. आठवडय़ाच्या सुरुवातीला जिद्दीने काम करा. पैसे अनाठायी गुंतवू नका. नवीन ओळखीवर भाळू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दा मांडताना उतावळेपणा नको. शुभ दिनांक ः 15

मीन – प्रतिष्ठा उंचावेल
मीनेच्या पराक्रमात सूर्य राश्यांतर, चंद्र बुध युती होत आहे. कोणताही प्रश्न सोडवताना तारतम्य ठेवा. व्यवसायात जम बसेल. नवीन सुधारणा करण्याची संधी मिळेल. लोकांच्या हिताचे कार्य केल्याने प्रतिष्ठा उंचावेल. नोकरीत कामाचे काwतुक होईल. चित्रपट कलाक्षेत्रात प्रगती होईल. शुभ दिनांक ः 13, 14

आपली प्रतिक्रिया द्या