साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021

>> नीलिमा प्रधान

मेष – कुटुंबात नाराजी होईल
चंद्र, मंगळ प्रतियुती, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. व्यवसायात यांत्रिक बिघाड होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना शह देत येईल. कुटुंबात क्षुल्लक कारणाने नाराजी होईल. नोकरीत तुमच्या कामात ढवळाढवळ केली जाईल. मैत्रीत दुरावा राहील. शुभ दिनांक ः 27, 28

वृषभ – शेअर्समध्ये गुंतवणूक करा
चंद्र, गुरू युती, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील महत्त्वाची कामे करण्यात यश मिळेल. तुमचे प्रयत्न फलदायी ठरतील. शेअर्समध्ये गुंतवणूक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा गवगवा होईल. काwटुंबिक प्रश्नावर मार्ग मिळेल. कलासहित्यात परिचय वाढेल. शुभ दिनांक ः 28, 29

मिथुन – जबाबदारी वाढेल
चंद्र, मंगळ प्रतीयुती, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. कोणताही प्रश्न रेंगाळत ठेवू नका. व्यवसायात चर्चा करताना तणाव होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. नोकरीत तुमच्यावर जबाबदारी देण्यात येईल. कायद्याचे पालन करा. प्रगतिकारक घटना घडतील. शुभ दिनांक ः 26, 30

कर्क – अरेरावीची भाषा नको
मंगळ, शनी प्रतियुती, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. व्यवसायातील समस्या रेंगाळत ठेवू नका. अरेरावीची भाषा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टीकोन ठेवा. इतरांच्या सांगण्याकडे लक्ष देऊ नका. लोकांच्या समस्या सोडवा. लोकप्रियता वाढेल. कलाक्षेत्रात नव्या गोष्टी करून दाखवाल. शुभ दिनांक ः 1, 2

सिंह – रागावर ताबा ठेवा
चंद्र, गुरू युती, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. अडचणींवर मात करून यश मिळवा. रागावर ताबा ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक तोंडघशी पाडतील. मानसिक, शारीरिक दडपण येईल. जुन्या अनुभवांचा उपयोग करा. प्रतिष्ठा सांभाळा.
शुभ दिनांक ः 29, 30

कन्या – कामाला प्राधान्य द्या
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र बुध लाभ योग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील कामांना प्रथम प्राधान्य द्या. चर्चा यशस्वी ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज लोकांचा परिचय होईल. जमीन, घर यासंबंधी समस्या निर्माण होतील. एखादे किचकट काम करून दाखवाल.
शुभ दिनांक ः 1, 2

तूळ –  क्षुल्लक तणाव होतील
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र गुरू लाभयोग होत आहे. क्षुल्लक ताणतणाव होतील. उद्योग, व्यवसायात नफा मिळेल. आर्थिक सल्ल्याने गुंतवणूक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य निर्णय घेऊ शकाल. कुटुंबात तुमच्या कामाचे काwतुक होईल.
शुभ दिनांक ः 28, 29

वृश्चिक – सावध राहा
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, चंद्र बुध लाभयोग होत आहे. सावध राहून काम करा. सावध राहून काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध राहून निर्णय घ्या. विरोधकांकडे लक्ष न देता योजनांकडे लक्ष द्या. कुटुंबात जबाबदारी वाढेल. नोकरीत स्वतŠच्या कामाकडे लक्ष द्या.
शुभ दिनांक ः 1, 2

धनु – प्रत्येक दिवस महत्त्वाचा
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र गुरू युती होत आहे. आठवडय़ाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरेल. उद्योग धंद्यात यश मिळेल. तडजोड करावी लागेल. तुमचा आत्मविश्वास, उत्साह वाढत जाईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा सांभाळा. नोकरीत कामामध्ये तत्परता दाखवाल.
शुभ दिनांक ः 27, 28

मकर – अतिशयोक्ती टाळा
चंद्र, गुरू युती, चंद्र शुक्र त्रिकोण योग होत आहे. अतिशयोक्ती टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शब्द देताना सावध रहा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. व्यवहारात फसगत होऊ शकते. वरिष्ठांना नाराज करू नका. कला, क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य दाखवाल.
शुभ दिनांक ः 29, 30

कुंभ – संयम ठेवा
चंद्र, गुरू युती, सूर्य चंद्र त्रिकोण योग होत आहे. प्रवासात सावध रहा. गैरसमज होईल असे वर्तन टाळा. उद्योग धंद्यात भागीदरासह निर्णय घ्या. संयम ठेवून कामे मार्गी लावा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना शह देण्यात यश मिळवाल. क्षुल्लक वाद होतील.
शुभ दिनांक ः 1, 2

मीन – कायद्याच्या कक्षेत रहा
चंद्र, शुक्र त्रिकोण योग, चंद्र, बुध लाभ योग होत आहे. व्यवसायातील समस्या सोडवाल. कायद्याच्या कक्षेत राहून काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक कारस्थान रचतील. नोकरीत कामाचा ताण राहील. कला, क्रीडा साहित्य क्षेत्रात उत्साह वाढेल.
शुभ दिनांक ः 2, 3

आपली प्रतिक्रिया द्या