साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 7 ते शनिवार 13 मार्च 2021

>> नीलिमा प्रधान

‘मेष – डावपेच प्रभावी ठरतील
मेषेच्या एकदशात बुध राश्यांतर, सूर्य-नेपच्यून युती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, तुम्ही तुमच्या कामात यश संपादन कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळेल. तुमचे डावपेच प्रभावी ठरतील. व्यवसाय, नोकरीत वर्चस्व वाढेल. चित्रपट, कला, साहित्य क्षेत्रात प्रगती होईल.

शुभ दिनांक – 7, 8

वृषभ – कामात आघाडीवर राहाल
वृषभेच्या दशमेशात बुध राश्यांतर, चंद्र-शुक्र युती होत आहे. आठवडय़ाची सुरुवात तणावाची झाली तरी त्यानंतर प्रत्येक कामात आघाडीवर राहाल. राजकीय, सामाजिक कार्याला दिशा मिळेल. अधिकारात वाढ होईल. व्यवसायात चांगला बदल होईल. मोठे कंत्राट मिळवा. कला, क्रीडा क्षेत्रात बाजी माराल.

शुभ दिनांक – 9,10

मिथुन – कराराची घाई नको
मिथुनेच्या भाग्येशात बुध राश्यांतर, सूर्य-नेपच्यून युती होत आहे. तुमच्या कामात येणाऱया अडचणी दूर करता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे नव्याने मांडता येतील. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. नवीन परिचयाने विचारांना चालना मिळेल. व्यवसायात लक्ष द्या. कराराची घाई करू नका.

शुभ दिनांक – 7, 8

कर्क – निर्णयात सावधगिरी बाळगा
कर्केच्या अष्टमेषात बुध प्रवेश, चंद्र-गुरू युती होत आहे. तुमच्या क्षेत्रात तुम्ही घेतलेला निर्णय चुकणार नाही याकडे लक्ष द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्ही ठरवलेले डावपेच उघड होण्याची शक्यता आहे. व्यवसायात फायदेशीर योजना मिळेल पण याबाबत सावधानता ठेवा. गैरसमज होतील.
शुभ दिनांक – 9, 10

सिंह – विरोधकांना शह द्याल
सिंहेच्या सप्तमेशात बुधाचा प्रवेश, सूर्य-नेपच्यून युती तुमच्या कार्याला साहाय्य करणार आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना शह देण्यात यश मिळेल. युक्तीने कार्य पार पाडा. लोकसंग्रह वाढेल. नोकरीतील कठीण कामे वेळीच पूर्ण करा. चित्रपट, कला, क्रीडा क्षेत्रात नवी संधी मिळेल.
शुभ दिनांक – 7, 8

कन्या – मौल्यवान वस्तू सांभाळा
कन्येच्या षष्ठशात बुध प्रवेश, चंद्र-गुरू युती होत आहे. क्षेत्र कोणतेही असो, चौफेर सावध राहा. प्रसंगाचे निरीक्षण करूनच अनुमान ठरवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ भूमिका घेतल्यास प्रतिष्ठsवर आच येणार नाही. गैरफायदा घेतला जाईल अशी संधी कोणाला देऊ नका. मौल्यवान वस्तू सांभाळा.

शुभ दिनांक – 9, 10

तूळ – कायद्याचे पालन करा
तुळेच्या पंचमेशात बुध प्रवेश, सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील किचकट कामे करून घ्या. वेळेला महत्त्व द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्ञानात भर पडणारी घटना घडेल. दिग्गज लोकांचा सहवास लाभेल. कायद्याचे पालन करून कार्य पूर्ण करा. कुटुंबात सुखद समाचार मिळेल.
शुभ दिनांक – 7, 8

कोणतेही प्रश्न सौजन्याने सोडवा
वृश्चिक ः वृश्चिकेच्या सुखस्थानात बुध प्रवेश, चंद्र-गुरू युती होत आहे. प्रत्येक दिवस तुमचे मनोबल टिकविणारा असला तरी यश जिद्दीने मिळवावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनहिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होईल. मात्र प्रश्न सौजन्याने सोडवा. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल.

शुभ दिनांक – 7, 8

धनु – वेगाने प्रगती कराल
धनुच्या पराक्रमात बुध प्रवेश, सूर्य-नेपच्यून युती होत आहे. प्रत्येक कार्यात वेगाने प्रगती कराल. मेहनत घेऊन तुमचे ध्येय साध्य कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पूर्वी झालेले गैरसमज दूर होतील. व्यवसायात सुधारणा होईल. नवीन परिचय प्रेरणा देणारा ठरेल. कुटुंबात आनंददायी प्रसंग घडतील.

शुभ दिनांक – 8,10

मकर – ग्रहांची साथ लाभेल
मकरेच्या धनेशात बुध प्रवेश, सूर्य-नेपच्यून युती होत आहे. साडेसाती सुरू असली तरी मेहनतीने कार्य साध्य कराल. ग्रहांची साथ मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खंबीरपणे योजना तयार करा. डावपेच नीट टाकण्यासाठी अभ्यास करा. कुटुंबातील तणाव कमी होतील. शिक्षणात यश मिळेल. तुमच्या क्षेत्रात नवी संधी मिळेल.
शुभ दिनांक – 11, 12

कुंभ -दिग्गजांचे मार्गदर्शन घ्या
स्वराशीत बुध प्रवेश, सूर्य, नेपच्यून युती होत आहे. नवे प्रश्न तयार होतील. त्यावर उपाय शोधा. जुन्या अनुभवांचा उपयोग करून घेता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक समस्या निर्माण करतील, मात्र जनतेचे प्रेम मिळेल. दिग्गज लोकांचे मार्गदर्शन घ्या. व्यवसायातील तणाव कमी होतील.

शुभ दिनांक – 7, 8
मीन – अतिशयोक्ती नको
मीनेच्या व्ययेषात बुध प्रवेश, चंद्र-गुरू युती होत आहे. मानसिक दडपण येईल. अतिशयोक्ती दूर सारून वागा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव निर्माण होईल. मोह टाळा. व्यवहारात घाई नको. भावना आणि व्यवहार यांची गल्लत नको. नोकरीच्या कामात बेसावध राहू नका.
शुभ दिनांक – 7, 8

आपली प्रतिक्रिया द्या