साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 एप्रिल 2021

>> नीलिमा प्रधान

मेष- समस्यांवर उपाय मिळेल
सूर्य-बुध युती, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. किचकट समस्यांवर उपाय शोधता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. मात्र डावपेच उघड करू नका. व्यवसायात धावपळ होईल. नवीन लोकसंग्रह तयार कराल. नोकरीत वर्चस्व राहील. कामात अडथळा येईल. शुभ दिनांक ः 18, 19

वृषभ – कसोटीचा कालावधी
चंद्र-गुरू प्रतियुती, सूर्य-चंद्र केंद्रयोग होत आहे. यश मिळवण्यासाठी धावपळ करावी लागेल. कसोटीचा कालावधी आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप होतील. उद्योगधंद्यात मोह ठेवू नका. व्यवहारात सावध रहा. खर्च टाळा. कुटुंबात चिंता राहील. शुभ दिनांक ः 19, 21

मिथुन – प्रत्येक दिवस प्रेरणादायी
सूर्य-बुध युती, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. कोणताही कठीण प्रश्न सोडवाल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील किचकट समस्या सोडवाल. प्रत्येक दिवस प्रेरणादायी ठरेल. विरोधकांना चकीत करणारे यश मिळेल. उद्योगधंद्यात जम बसवा. आपापसातील गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. शुभ दिनांक ः 21, 22

कर्क – रागावर ताबा ठेवा
सूर्य-बुध युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला प्रवासात सावध रहा. रागावर ताबा ठेवून जुळत आलेले काम मार्गी लावा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ होईल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. व्यवसायात फायदा होईल. कला, क्रीडा, साहित्यात यश मिळेल. शुभ दिनांक ः 25, 27

सिंह – मनावर दडपण येईल
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. मनावर दडपण येणाऱया घटना घडतील. उद्योगधंद्यात नव्या कामासंबंधी चर्चा होईल. मागील येणे वसूल करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेला कलह कमी करू शकाल. तुमच्या कार्याचा गौरव होईल. कुटुंबात शुभ घटना घडतील. शुभ दिनांक ः 18, 19

कन्या – महत्त्वाची कामे करा
चंद्र-शनी प्रतियुती, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. काही प्रश्न तटस्थपणे राहून अभ्यासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणतेही मत व्यक्त करण्याची घाई करू नका. दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. नोकरीत कायदा पाळा. कुटुंबात जबाबदारी वाढेल. शुभ दिनांक ः 18, 19

तूळ – अधिकार लाभतील
सूर्य-चंद्र त्रिकोणयोग, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. ग्रहांची साथ लाभेल. तेव्हा कठीण कामे लवकर करून घ्या. प्रत्येक दिवस यश देणारा ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार लाभतील. नवीन परिचय होतील. किचकट प्रश्न मार्गी लागतील. उद्योगधंद्यातील समस्या कमी होतील. यश मिळेल. शुभ दिनांक ः 19, 21

वृश्चिक – प्रसंगावधान राखा
चंद्र-शनी प्रतियुती, सूर्य-चंद्र षडाष्टक योग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला समस्या वाढतील. चर्चा वादाकडे झुकण्याची शक्यता आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक कुरघोडी करतील. जवळची माणसे फितूर होतील. कोणताही व्यवहार फसवा ठरू शकतो. जबाबदारी टाळू नका. शुभ दिनांक ः 20, 21

धनु – कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल
सूर्य-बुध युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. किरकोळ कारणाने मन विचलित होईल. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. तुमच्या कार्यक्षेत्रात महत्त्व वाढेल. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. शुभ दिनांक ः 18, 19

मकर – प्रश्न मार्गी लावता येतील
चंद्र-गुरू प्रतियुती, बुध-हर्षल युती होत आहे. अचानक वादाचे प्रसंग उद्भवतील. संयम ठेवा, रागावर ताबा ठेवा. प्रश्न मार्गी लावता येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. नवीन परिचयावर जास्त विश्वास ठेवू नका. व्यवहारात सावध रहा. धंद्यात कराराची घाई करू नका. शुभ दिनांक ः 20, 21

कुंभ – उद्योगधंद्यात संधी मिळेल
सूर्य-बुध युती, चंद्र-गुरू प्रतियुती होत आहे. वादग्रस्त विधान करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची वाटचाल कौतुकास्पद ठरेल. कायदा मोडू नका. उद्योगधंद्यात चांगली संधी मिळेल. मागील थकबाकी मिळेल. नोकरीत स्थिरता वाटेल. कला, साहित्यात विशेष यश मिळेल. कुटुंबातील चिंता कमी होईल. शुभ दिनांक ः 18, 19

मीन – उलटसुलट व्यवहार टाळा
सूर्य-बुध युती, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला कामे करून घ्या. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कुणाच्याही भानगडीत पडू नका. उलटसुलट व्यवहार टाळा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. अनुभवी व्यक्तींना कमी लेखू नका. शुभ दिनांक ः 20, 21

आपली प्रतिक्रिया द्या