साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 21 मे ते शनिवार 27 मे 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – उत्तम प्रगती होईल

सूर्य, प्लुटो त्रिकोणयोग, शुक्र, हर्षल लाभयोग. सप्ताहाच्या मध्यावर वादाचे प्रसंग निर्माण होतील. कुशलतेने मात करायला शिका. तुमच्या क्षेत्रात वर्चस्व वाढवा. नोकरीत उत्तम प्रगती होईल. व्यवसायात उत्कर्षाची संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभावी मुद्दे मांडता येतील. मागील येणे वसूल करा. शुभ दिनांक : 21, 22

वृषभ – प्रत्येक दिवस पुढे नेणारा

सूर्य, मंगळ लाभयोग. चंद्र, शुक्र युती. प्रत्येक दिवस पुढे नेणारा ठरेल. सलोख्याने मुद्दे तयार करा. कायदा पाळा. नोकरीतील कामे होतील. वरिष्ठांना कमी लेखू नका. योग्य मार्गदर्शन घ्या. धंद्यात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य शब्द वापरूनच मत व्यक्त करा. प्रतिष्ठा जपता येईल. कुटुंबातील कामे होतील. शुभ दिनांक: 22, 24

मिथुन – धंद्यात वाढ होईल

चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. दिशाहीन भरकटू नका. नम्रता, संयम ठेवल्यास कोणतेही काम अशक्य नाही. नाकेरीच्या कामात सावध रहा. धंद्यात गोड बोला. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अरेरावी करण्यापेक्षा निरीक्षण करा. स्नेहपूर्ण शब्दात मुद्दे उपस्थित करा. अहंकार दूर ठेवा. शुभ दिनांक: 24, 25

कर्क – आरोग्याची काळजी

सूर्य, मंगळ लाभयोग, सूर्य, प्लुटो त्रिकोणयोग. आक्रमकपणावर नियंत्रण ठेवा. प्रतिष्ठा लाभेल. व्यसन नको. मोह टाळा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगतीची संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद, प्रतिष्ठा पणाला लावून योजनांचा विकास करा. कुटुंबात क्षुल्लक नाराजी होईल. खर्च वाढतील. शुभ दिनांक : 25, 26

सिंह – वर्चस्व वाढेल

सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, शुक्र युती. तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहण्याची संधी मिळेल. प्रवासात नम्रता ठेवा. रागाने नुकसान होईल. धंद्यात वर्चस्व वाढेल. योग्य व्यवहार जुळून येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्याने कार्याची आखणी कराल. प्रगतीचा आलेख तयार करा. प्रतिष्ठा मिळेल. शुभ दिनांक : 21, 22

कन्या – शब्द जपून वापरा 

सूर्य, प्लुटो त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र युती. आठवडय़ाच्या सुरूवातीपासून कामे पूर्ण करा. उत्साह टिकून राहील. नोकरीत कठीण कामे लवकर संपवा. धंद्यात शब्द जपून वापरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचलित न होता. कार्य करा. प्रतिष्ठा, लोकप्रियता लाभेल. वेळेला महत्त्व द्या. प्रश्न मार्गी लागतील. शुभ दिनांक : 21, 22

तूळ – हलगर्जीपणा दूर ठेवा

चंद्र, बुध लाभयोग. चंद्र, शुक्र युती. बुद्धिचातुर्य वापरा. यश मिळेल. सहनशीलता ठेवा. नोकरीच्या कामात हलगर्जीपणा नको. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न होईल. तुमच्या योजनेनुसार कार्यावर भर द्या. लोकसंग्रह वाढवा. वरिष्ठांना दुखवू नका. शुभ दिनांक : 22, 24

वृश्चिक – मैत्रीत दुरावा जाणवेल

सूर्य, प्लुटो त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ युती. आठवडय़ाच्या सुरूवातीला आर्थिक लाभाची संधी मिळेल. नविन परिचय तपासून घ्या. नोकरीत कठीण कामाची अपेक्षा होईल. मैत्रीत दुरावा  जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतिमहत्त्वाची कामे करा. विरोधकांना शह देऊन ध्येय गाठावे लागेल. स्पर्धेत जिद्द ठेवा. शुभ दिनांक : 24, 25

धनु – मार्गदर्शन घ्या 

चंद्र, शुक्र युती. चंद्र, गुरू लाभयोग. आत्मविश्वास नियंत्रणात ठेवा. मृदूभाषा, चातुर्य यावर यश मिळेल. योग्य मार्गदर्शनाचा सल्ला घ्या. दौर्यात काळजी घ्या. कायदा पाळा. धंद्यात लाभ होईल. पैशांची गुंतवणूक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. वादात मनावरील ताबा सोडू नका. शुभ दिनांक : 22, 23

मकर – अयोग्य वक्तव्य टाळा

सूर्य, प्लुटो त्रिकोणयोग, चंद्र, मंगळ युती. अयोग्य वक्तव्य टाळा. स्पष्टवक्तेपणाने तणाव होतील. प्रकृतीची काळजी घ्या. दौऱ्यात सावध रहा. नोकरी टिकवा. गैरसमज होतील. धंद्यात नम्रता ठेवा. कर्ज घेऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला मोठेपणा मिळेल. नविन परिचयाबाबत सतर्क रहा. शुभ दिनांक : 24, 25

कुंभ – सलोखा ठेवा

चंद्र, बुध लाभयोग, चंद्र, शुक्र युती. वक्तव्य करताना सलोखा ठेवा. अहंकार दूर ठेवा. नोकरीत काम, व्याप वाढतील. धंद्यात वसुली करा. नवे काम मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दुसऱ्यांचे मत ऐका. वरिष्ठांना शह देण्यापेक्षा निरीक्षण करा. चांगल्या संधीची वाट पहा. दिग्गज परिचय उत्साहवर्धक ठरतील. शुभ दिनांक : 22, 23