साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 ऑगस्ट ते शनिवार 2 सप्टेंबर 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – प्रत्येक दिवस महत्त्वाचा

चंद्र, गुरू त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती. सप्ताहाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा. आठवडय़ाच्या शेवटी मतभेद, गैरसमज होतील. नोकरीत यश मिळेल. धंद्यात कठोर शब्द नको. मोह टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. नवीन परिचयावर भाळू नका. स्पर्धेत जिद्दीने प्रगती कराल. चिंता दूर ठेवा. शुभ दिनांक : 27, 29

वृषभ – वादाचे प्रसंग येतील

चंद्र, शुक्र प्रतियुती, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. वादाचे प्रसंग होतील. टाळण्याचा प्रयत्न करा. नोकरीत वरिष्ठांच्या इच्छेनुसार कामे करावी लागतील. धंद्यात पैसा मिळेल. अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा परिचय होईल. नम्रता ठेवल्यास महत्त्व वाढेल. मुलांसंबंधित प्रश्न सोडवाल. शुभ दिनांक: 1, 2

मिथुन – रागावर नियंत्रण ठेवा

सूर्य, शनि प्रतियुती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. पेचात टाकणारा प्रश्न तयार होईल. रागावर नियंत्रण ठेवा. योग्य मुद्यांचा विचार करून संयमाने समस्या सोडवा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. प्रवासात घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल.प्रभावी बोलणे कौतुकास्पद ठरेल. कामे होतील. शुभ दिनांक: 27, 1

कर्क – वेळेला महत्व द्या

चंद्र, मंगळ त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती. मान, प्रतिष्ठा वाढेल. थोरामोठय़ांच्या ओळखी होतील. वादाचे प्रसंग टाळल्यास चांगल्या कामांना गती मिळेल. वेळेला महत्व द्या. वर्चस्व वाढेल. नोकरीधंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांवर लक्ष ठेवा. शुभ दिनांक : 29, 2

सिंह – मनावर दडपण येईल

चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, गुरू लाभयोग. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. मनावर दडपण येईल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. समस्या सोडवता येईल. धंद्यात अरेरावी नको. मैत्रीत तणाव येईल. अनाठायी खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठोर बोलणे वादग्रस्त ठरेल. प्रतिष्ठा जपता येईल. शुभ दिनांक : 27, 30

कन्या – वादग्रस्त विधान नको 

चंद्र, मंगळ प्रतियुती, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. तुमचे मुद्दे योग्य असले तरी चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा करू नका. वादग्रस्त विधान करू नका. तटस्थ धोरण नको. नोकरी-धंदा टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांचा कल पाहून बोला. निरीक्षण करा. स्वतच्या कामात चूक नको. स्पर्धा कठीण आहे. शुभ दिनांक: 1, 2

तूळ – प्रवासात सावध रहा 

चंद्र, गुरू त्रिकोणयोग, मंगळ, शनि षडाष्टक योग. कठीण कामे करण्याचा प्रयत्न करा. प्रवासात सावध रहा. दुखापत, वाद टाळा. प्रेमाने जिंका. नोकरीत कामे वाढतील. धंद्यात क्षुल्लक वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोक गुप्त कारस्थाने करतील. तुमचा संताप वाढेल. चातुर्याने बोलून मात करा. शुभ दिनांक : 27, 30

वृश्चिक – कामावर लक्ष केंद्रित करा 

चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती. महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांना न दुखावता हित साधा. नोकरीधंद्यात प्रगती कराल. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणींवर मात करून नवा टप्पा गाठाल. दिग्गज व्यक्तींचा पाठिंबा राहील. शुभ दिनांक : 27, 28

धनु – नोकरीत यश मिळेल 

चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. जवळच्या व्यक्ती तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही खंबीर रहा. संयम बाळगा. मार्ग मिळेल. नोकरीत यश मिळेल. मैत्रीत सावध रहा. व्यवहारात फसू नका. धंद्यात मोह टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज होतील.  सावध रहा. शुभ दिनांक : 28, 29

मकर – सावधपणे वक्तव्य करा

सूर्य, चंद्र षडाष्टक योग. चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो वक्तव्य सावधपणे करा. प्रतिष्ठा जपा. मैत्री वाढेल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात किचकट प्रश्नावर काम करावे लागेल. करार करण्याचा उतावळेपणा नको. मोठेपणाच्या आहारी न जाता काम करा आणि चूक टाळा. संयमी कृती ठेवा. शुभ दिनांक :1, 2

कुंभ – सतर्क रहा 

मंगळ, शनि षडाष्टक योग, चंद्र, बुध प्रतियुती. प्रकृतीची काळजी घ्या. अरेरावी, तणाव, भावनेचा उद्रेक याचा सामना करावा लागेल. बुद्धीचातुर्य वापरून धोका टाळा. कामे जास्त करा. नोकरीधंद्यात प्रगती कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. तुमच्याविषयी द्वेष निर्माण केला जाईल. सतर्क रहा. शुभ दिनांक : 27, 2

मीन – अहंकार दूर ठेवा

सूर्य, चंद्र षडाटक योग. चंद्र, मंगळ प्रतियुती. अहंकार, बेताल बोलणे यामुळे संकट ओढवून घ्याल. गोड बोलून लोकांचे मन जिंका. नोकरीच्या कामात चूक नको. व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योग्य व्यक्तीचा सल्ला ऐका. संयम, कौशल्य  यानेच यश मिळेल. अपमान टाळण्याचा प्रयत्न करा. शुभ दिनांक : 27, 28