
>> नीलिमा प्रधान
मेष – कामात चूक टाळा
मेषेच्या भाग्येषात बुध, शुक्र, हर्षल षडाष्टक योग. भावना व कर्तव्य यांचा मेळ घालण्यात चूक होईल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. प्रकृती जपा. नोकरीधंद्यात अरेरावी नको. कामात चूक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे गुपित उघड होण्याची शक्यता. खर्च वाढेल. कुटुंबात गैरसमज होतील.
शुभ दिनांक : 28, 29
वृषभ – प्रत्येक दिवस यश देणारा
वृषभेच्या अष्टमेषात बुध, सूर्य, चंद्र लाभयोग. महत्त्वाची कामे, वसुली, कर्जाचे प्रकरण याबाबतीत लवकर निर्णय घ्या. प्रत्येक दिवस यश देणारा ठरवा. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पदाधिकार लाभतील. प्रेरणादायक घटना घडेल.
शुभ दिनांक : 28, 29
मिथुन – दडपण येईल
मिथुनेच्या सप्तमेषात बुध, शुक्र हर्षल षडाष्टक योग. आठवडय़ाच्या सुरूवातीला मानसिक, शारीरिक दडपण येईल. वरीष्ठांचा रोष सहन करावा लागेल. तडजोड करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात द्विधा अवस्था झाल्याने निर्णय घेणे कठीण आरोप येतील. संताप वाढणारी घटना घडेल.
शुभ दिनांक : 30, 2
कर्क – योजना मार्गी लागतील
कर्केच्या षष्ठेषात बुध, शुक्र मंगळ प्रतियुती. कठीण कामे रेंगाळत ठेऊ नका. वसुली करा. नोकरीधंद्यात पुढे जाल. कला, क्रिडा, साहित्यात उच्च प्रतीचे यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा, पद मिळेल. योजना मार्गी लावा. लाभ होईल. वाटाघाटीत, कोर्टकेसमध्ये यश मिळेल.
शुभ दिनांक : 28, 29
सिंह – चिंता वाढेल
सिंहेच्या पंचमेषात बुध, शुक्र हर्षल षडाष्टक योग. जवळच्या माणसांनी केलेली दगाबाजी सहन होणार नाही. प्रकृतीची काळजी घ्या. दुष्टचक्रात अडकल्याने चिंता वाढेल. धंदा, नोकरी टिकवा. कठोर बोलणे टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवा धडा शिकाल. कुटुंबात धावपळ होईल.
शुभ दिनांक : 30, 1
कन्या – चांगला निर्णय घ्याल
कन्येच्या सुखस्थानात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. आत्मविश्वास, उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. तुमच्या क्षेत्रात चांगला निर्णय घ्याल. नोकरीधंद्यात यश मिळेल. गुंतवणूक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा उंचावेल. कोर्टकेस संपवा. मुलांच्या बाबतीत सुखद घटना घडेल. यश मिळेल.
शुभ दिनांक : 28, 2
तुळ- उत्साहवर्धक घटना घडतील
तुळेच्या पराक्रमात बुध, शुक्र, मंगळ प्रतियुती. क्षुल्लक वाद वाढवू नका. आर्थिक लाभ होईल. नोकरीधंद्यात चांगली घटना घडेल. कामाचे चौफेर कौतुक होईल. वसुली, कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज परिचय होतील. उत्साहवर्धक घटना घडतील. कला, साहित्यात यश मिळेल.
शुभ दिनांक : 27, 28
वृश्चिक – शेअर्समध्ये यश मिळेल
वृश्चिकेच्या धनेषात बुध, चंद्र, गुरू लाभयोग. अडचणीत आलेली कामे करा. घर, जमिन यासंबंधी प्रश्न सोडवा. नोकरीधंद्यात लाभ होईल. शेअर्समध्ये यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग दिसेल. चौफेर कौतुक, मानसन्मान मिळेल. कुटुंबात चांगली बातमी मिळेल.
शुभ दिनांक : 28, 29
धनु – विचलीत होऊ नका
स्वराशीत बुध, शुक्र, हर्षल षडाष्टक योग. अनावश्यक दडपण घेऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. नोकरीधंद्यात गैरसमज, तणाव होतील. यांत्रिक बिघाडावर खर्च होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. विचलीत न होता ध्येय गाठा.
शुभ दिनांक ः 28, 29
मकर – चौफेर कौतुक होईल
मकरेच्या व्ययेषात बुध, सूर्य, चंद्र लाभयोग. ठरवलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरीधंद्यात लाभ होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. योग्य गुंतवणूक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कर्तव्य पूर्ण कराल. चौफेर सन्मान, कौतुक होईल. कोणतेही वक्तव्य नीट करा. पुढे मोठे यश मिळवायचे आहे. नावलौकिक वाढेल.
शुभ दिनांक : 30, 2
कुंभ – परिचय फायद्याचे ठरतील
कुंभेच्या एकादशात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. आठवडय़ाच्या सुरूवातीला बोलण्यात चूक करू नका. कायदा पाळा. अनेक कठीण प्रश्न मार्गी लावण्याची तयारी ठेवा. नोकरीधंद्यात लाभ होईल. वसुली, कर्जाचे काम करा. थोरामोठय़ांचे परिचय फायद्याचे ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवा मार्ग शोधा.
शुभ दिनांक ः 30, 2
मीन – यशाचे रिंगण मोठे करा
मीनेच्या दशमेषात बुध, सूर्य, चंद्र लाभयोग. ठरवाल ते करून दाखवाल. नोकरीधंद्यात वाढ होईल. वसुली करा. यशाचे रिंगण मोठे करा. गुंतवणूक योग्य प्रकारे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काळ, काम, वेग याचे गणित योग्य प्रकारे जुळवा. प्रतिष्ठा लाभेल. लग्नासंबंधी प्रश्न सोडवा.
शुभ दिनांक ः 29, 30