>> नीलिमा प्रधान
मेष – कामाचा वेग वाढेल
मेषेच्या भाग्येषात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. खोचक बोलण्याचा त्रास सहन करावा लागेल. तुमची अनेक कामे मार्गी लागतील. नोकरीत कामाचा वेग वाढेल. कौतुकास्पद काम करून दाखवाल. बढती, बदली शक्य. धंद्यात नवे धोरण राबवता येईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवायांवर नजर ठेवा. दिग्गज नेत्यांच्या समवेत चर्चा करा.
शुभ दि. 31, 2
वृषभ -वाद वाढवू नका
वृषभेच्या अष्टमेषात बुध, चंद्र शुक्र युती. अहंकाराची, स्वार्थीपणाची भावना यांचे प्रदर्शन त्रासदायक ठरेल. सहनशीलता ठेवल्यास अनेक कामांना जिद्दीने पुढे नेता येईल. नोकरीत वाद वाढवू नका. धंद्यात हिशेब नीट करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणताही मुद्दा मांडताना उतावळेपणा नको. सर्वांच्या सहमतीने मोठा निर्णय घ्या.
शुभ दि. 1, 2
मिथुन – कार्यावर लक्ष द्या
मिथुनेच्या सप्तमेषात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. खर्चावर लगाम घालता येईल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीतील तणाव, गैरसमज वेळीच दूर करा. संतापाने कोणताही प्रश्न सोडवता येणार नाही. धंद्यातील चूक सुधारून पुढे जाता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिलासा देणारी घटना घडेल. प्रभावी भाष्य कराल.
शुभ दि. 31, 4
कर्क – कामात सावध रहा
कर्केच्या षष्ठेशात बुध, शुक्र मंगळ षडाष्टक योग. कामांची गती मंदावल्यामुळे चिडचिडेपणा वाढेल. कठोर बोलणे सर्वत्र मनस्ताप देणारे ठरेल. प्रकृतीची काळजी घ्या. खाण्यापिण्याची चंगळ त्रासदायक ठरेल. कोणत्याही कामात सावधपणा ठेवा. नोकरीधंदा हुशारीने टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायदा मोडेल अशी कृती टाळा.
शुभ दि. 29, 1
सिंह – नोकरीत प्रभाव राहील
सिंहेच्या पंचमेषात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. क्षुल्लक कारणाने सुद्धा संताप येईल त्यामुळे दुर्लक्ष करा. नोकरीत प्रभाव राहील. कामाची प्रशंसा होईल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात व दौऱयात सावध रहा. तुमची लोकप्रियता वाढेल. नवे परिचय उत्साहवर्धक ठरतील. आर्थिक साहाय्य वाढेल. घरगुती कामे वेगाने पूर्ण कराल.
शुभ दि. 31, 4
कन्या – संयम बाळगा
कन्येच्या सुखस्थानात बुध, शुक्र मंगळ षडाष्टक योग. मनाविरुद्ध घटनांनी मनस्ताप, तणाव जाणवेल. कठोर प्रतिक्रिया देणे घातक ठरेल. दूरदृष्टिकोन ठेवा. संयम बाळगा. नोकरीधंद्यात गोड बोला. कामात चूक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक आरोप करतील. वेदना देणारे भाष्य ऐकावे लागेल.
शुभ दि. 1, 2
तूळ – आळस दूर ठेवा
तूळेच्या पराक्रमात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. आळस न करता वेळेत कामे पूर्ण करता येतील. नोकरीत प्रभाव वाढेल. बदलाची शक्यता. धंद्यात चांगला प्रतिसाद लाभेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ मोठे आश्वासन देतील. गैरसमज दूर करण्याची संधी सोडू नका. मैत्री दृढ करा. खरेदी-विक्रीत लाभ होईल.
शुभ दि. 29, 4
वृश्चिक – दिग्गजांचे सहकार्य मिळेल
वृश्चिकेच्या धनेषात बुध, चंद्र गुरू त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस यशाचा ठरावा. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. अनेक दिग्गजांचे सहकार्य मिळेल. नोकरीधंद्यातील अडचणी कमी होतील. चांगला बदल शक्य होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर प्रगती होईल. कठीण कामे कराल. योजनांना गतिमान कराल.
शुभ दि. 31, 1
धनु – रागावर नियंत्रण ठेवा
स्वराशीत बुध, चंद्र शुक्र युती. भावनेच्या भरात कुणालाही आश्वासन देऊ नका. व्यवहारात सावध रहा. नोकरीत नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सौम्य शब्दात मनोगत व्यक्त करा. योजनांकडे पूर्ण लक्ष द्या. व्यवहारात सावध रहा. प्रतिष्ठा वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा.
शुभ दि. 1, 2
मकर – निर्णयात सावधगिरी बाळगा
मकरेच्या व्ययेषात बुध, मंगळ प्लुटो प्रतियुती. घाई गडबडीत चुकीचा निर्णय घेऊ नका. अहंकार, राग यामुळे तुमच्यावर रोष वाढेल. नम्रता, समजूतदारपणा अधिक फायदेशीर ठरेल. नोकरीत दगदग, चिंता जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहनशीलता ठेवा. कुणाचाही अपमान होणार नाही याची दक्षता घ्या. तुमची प्रतिमा जपा.
शुभ दि. 29, 31
कुंभ – धंद्यात जम बसेल
कुंभेच्या एकादशात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. कोणतेही कठीण काम कराल. धंद्यात जम बसेल. वसुली करा. नवे काम मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवे डावपेच ठरवण्यात यश, दिग्गजांचा सहवास प्रेरणादायी विरोधकांना शह देता येईल. नवे काम मिळवा. स्पर्धेत यश मिळेल. घरात शुभ समाचार मिळेल.
शुभ दि. 29, 31
मीन – नोकरीत प्रभाव राहील
मीनेच्या दशमेषात बुध, सूर्य चंद्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरूवातीला कामे पूर्ण करा. आत्मविश्वासात भर पडतील अशा घटना तुमच्या क्षेत्रात घडतील. नोकरीत प्रभाव दिसेल. मैत्रीत सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या अपरोक्ष गैरसमज करून दिला जाईल. वरिष्ठांशी चर्चा करता येईल.
शुभ दि. 29, 31