साप्ताहिक भविष्य – रविवार 29 जानेवारी ते शनिवार 4 फेब्रुवारी 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – उत्साह वाढवणारा काळ

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र बुध प्रतियुती. प्रत्येक दिवस उत्साह, आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. मेहनत घ्या. यश मिळवा. नोकरीत प्रशंसा होईल. धंद्यात गुंतवणूक वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक प्रतिष्ठांच्या समवेत चर्चा सफल. नवे डावपेच ठरवाल. कुटुंबातील कामे होतील.
शुभ दिनांक : 31़ 2

वृषभ – नवीन परिचय फायदेशीर

चंद्र, गुरू लाभयोग, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. शाब्दिक तणाव जाणवेल. मात्र तुमची कठीण कामे करून घ्या. नोकरीत चकमक टाळा. धंद्यात लाभ, नविन परिचय फायदेशीर ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गतिमान करा. सन्मानात भर पडेल. कायद्याला धरून वक्तव्य करा. चांगला निर्णय घ्याल.
शुभ दिनांक : 2, 3

मिथुन – रागावर ताबा ठेवा

बुध, हर्षल त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र षडाष्टक. अधिकारी थाटातील वागणे समस्या निर्माण करेल. बुद्धिचातुर्याचे काwतुक होईल. नोकरीत व्याप वाढेल. धंद्यात नवा पर्याय मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया होतील. वरीष्ठांच्या मनात द्वेष निर्माण होईल. प्रकृतीची काळजी घ्या. रागावर ताबा ठेवा.
शुभ दिनांक : 3, 4

कर्क -नवीन परिचयात सावधगिरी

चंद्र, गुरू लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. नविन परिचयावर भाळू जाऊ नका. दुसऱयाशी तुलना करताना स्वतŠच्या चुकांकडे लक्ष द्या. नोकरीत वरीष्ठांना मदत करावी लागेल. धंद्यात अरेरावी नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे नीट तपासा, जवळच्या व्यक्ती अडथळा निर्माण करतील. प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक : 29, 31

सिंह – प्रतिष्ठेचा बाऊ नको

सूर्य, चंद्र षडाष्टक योग. बुध, हर्षल त्रिकोणयोग. महत्त्वाची कामे आठवडय़ाच्या सुरूवातीला करा. नोकरीत सहनशीलता ठेवा. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेचा बाऊ न करता सहयोगाने वागा. बुद्धिमतेचे कसब दाखवा. कायदा मोडू नका. स्पर्धा सोपी नाही.
शुभ दिनांक : 29, 31

कन्या – नोकरीत वर्चस्व राहील

चंद्र, गुरू लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. कोणतेही काम रेंगाळत ठेऊ नका. खाण्यापिण्याची काळजी घ्या. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात फसगत टाळा. दूरदृष्टिकोन ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपशब्द ऐकावे लागतील. मनस्वास्थ्य सांभाळा. अनाठाई खर्च टाळा. कुटुंबात तणाव जाणवेल.
शुभ दिनांक : 31, 3

तूळ – अहंकार दूर ठेवा

बुध, हर्षल त्रिकोणयोग. चंद्र, बुध प्रतियुती. प्रेमाने, युक्तीने बोलून यश खेचून आणावे लागेल. नोकरी टिकवा. धंद्यात फायदा होईल. अहंकार, राग आवरा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला हिणवायचा प्रयत्न होईल. प्रसंगावधान ठेवा. प्रवासात सावध रहा. दुखापत टाळा. कुटुंबात तटस्थ भूमिका घ्या.
शुभ दिनांक : 29, 3

वृश्चिक – नवी संधी मिळेल

चंद्र, गुरू लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. स्तुती करणाऱया व्यक्तीवर जास्त विश्वास ठेऊ नका. धंद्यात जागृत रहा. नोकरीत बुद्धिचे, कामाचे काwतुक होईल. नविन संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भावनेच्या आहारी न जाता बुद्धि वापरा. मानसन्मान वाढेल. स्पर्धेत चमकाल.
शुभ दिनांक : 31, 4

धनु – कामात दगदग होईल

चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती. दिग्गज व्यक्तींचा परिचय उत्साहवर्धक ठेरल. नोकरीत कामाचे काwतुक होईल. कामात दगदग होईल. धंद्यात होणारी वाढ विरोधकांना खपणार नाही. वारंवार राग वाढवणाऱया घटना घडतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचे काwतुक होईल.
शुभ दिनांक : 29, 2

मकर – कार्यात उन्नती होईल

चंद्र, गुरू लाभयोग, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग. तुमच्या क्षेत्रात आघाडीवर राहाल. बोलताना काळजी घ्या. करारात फसू नका. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात गिऱहाईक सांभाळा. राजकीय, सामाजेक क्षेत्रात रचनात्मक कार्यात उन्नती होईल. दिग्गज लोकांचा परिचय होतील. यश मिळेल.
शुभ दिनांक : 31, 4

कुंभ – नोकरीत व्याप वाढेल

चंद्र, गुरू लाभयोग, चंद्र, बुध प्रतियुती. या सप्ताहात तणाव, कटकट, दगदग जाणवेल. महत्त्वाच्या वस्तु सांभाळा. नोकरीत व्याप वाढेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात राग वाढवणारे लोक जास्त असतील. तटस्थ धोरण ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. मित्रपरिवारात वाढ होईल.
शुभ दिनांक : 29, 3

मीन – महत्त्वाचा निर्णय घ्याल

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, बुध प्रतियुती. प्रत्येक दिवस यशाचा ठरेल. कठीण कामे याच सप्ताहात करून घ्या. गोड बोलणाऱया व्यक्तीपासून सावध रहा. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. मोह, व्यसन टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत प्रगती कराल.
शुभ दिनांक : 29, 31