साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 4 जून ते शनिवार 10 जून 2023

>> नीलिमा प्रधान

मेष

करार यशस्वी होतील

मेषेच्या धनेशात बुध, शुक्र-प्लुटो प्रतियुती. वादाचे, गैरसमजाचे प्रसंग निर्माण होतील. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात चर्चा, करार यशस्वी होतील. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मानप्रतिष्ठा वाढेल. संयमाने भूमिका निभवा. घर, जमीन खरेदी-विक्रीत सावध रहा. शुभ दि.: 6, 7

वृषभ

कायदा पाळा

स्वराशीत बुध, चंद्र-शुक्र प्रतियुती. सप्ताहाच्या सुरुवातीला समस्या येईल. त्यानंतर वेगाने कामे होतील. कायदा पाळा, विचारपूर्वक कामे करा. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात मेहनत घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रात किचकट कामे पूर्ण करा. जनहिताच्या कार्यासाठी झोकून देऊन काम करा. शुभ दि. : 7, 8

मिथुन

दगदग होईल

मिथुनेच्या व्ययेशात बुध, चंद्र-गुरू त्रिकोणयोग. दगदग, धावपळ होईल. नम्रता, सहनशीलता बाळगा. नोकरीच्या कामात चूक टाळा. धंद्यात, हिशेबात सावध रहा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठेचा बाऊ न करता कामे करा. लोकप्रियता लाभेल. नवीन परिचय आत्मविश्वास देणारा ठरेल. शुभ दि.: 6, 10

कर्क

वादाचे प्रसंग येतील

कर्केच्या एकादशात बुध, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. वादाचे, तणावाचे प्रसंग येतील. बुद्धिचातुर्याने मार्ग शोधा. नोकरीत कामाचे कौतुक होईल. धंद्यात फायदा होईल. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वर्चस्व राहील. योग्य मुद्दे मांडता येतील. कुटुंबात नवा निर्णय होईल. शुभ दि.: 7, 8

सिंह

कामाचा व्याप वाढेल

सिंहेच्या दशमेशात बुध, सूर्यöचंद्र त्रिकोणयोग. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घालणे गरजेचे ठरेल. नोकरीत व्याप वाढला तरी पत राहील. नवीन ओळख फसवी ठरेल. धंद्यात लाभ होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत अनेक दिग्गज लोकांचे सहकार्य मिळेल. जनहिताचा प्रश्न मार्गी लावा. शुभ दि.: 5, 10

कन्या

योजनांकडे लक्ष द्या!

कन्येच्या भाग्येशात बुध, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. मेहनत, मधुर वाणी, चाणाक्षपणा यावर यश जास्त अवलंबून आहे. नोकरीतील कठीण कामे होतील. धंद्यात करार सावधपणे करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत ठरवलेल्या योजनांवर लक्ष द्या. लोकप्रियता टिकून ठेवा. प्रकृतीची हेळसांड नको. शुभ दि.: 7, 8

तूळ

संयमाने यश मिळेल

तुळेच्या अष्टमेशात बुध, सूर्य-चंद्र षढाष्टक योग. आत्मविश्वास, संयम या तत्त्वावर यश मिळवा. नोकरीत अडचणी  येतील. धंद्यात सतर्क रहा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न होईल. वरिष्ठ, सहकारी तुमच्या बाजूने उभे राहतील. सहनशीलता वाढवा म्हणजे यश सोपे होईल.   शुभ दि.: 6, 10

वृश्चिक

चर्चा यशस्वी होईल

वृश्चिकेच्या सप्तमेशात बुध, शुक्र-प्लुटो प्रतियुती. कठीण कामे पूर्ण करा. चर्चा यशस्वी होईल. नोकरीतील समस्या मिटवाल. धंद्यातील तणाव कमी होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विरोधकांना उत्तरे देता येतील. लोकप्रियता, प्रतिष्ठा वाढेल. जनहिताच्या कार्याला वेग येईल. कौटुंबिक वातावरण सुधारेल. शुभ दि.: 6, 7

धनु

कार्याता गती मिळेल

धनुच्या षष्ठेशात बुध, सूर्य-चंद्र षडाष्टक योग. सोमवारपासून कार्याला गती मिळेल. राग, अहंकार ठेवल्यास अडचणी वाढतील. प्रकृतीची काळजी घ्या. मौल्यवान वस्तू सांभाळा. नवीन परिचय नीट तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधावर मत मांडण्यापेक्षा तटस्थ भूमिका घेऊन ध्येय गाठा. स्पर्धा कठीण.  शुभ दि.: 7, 8

मकर

रागावर ताबा ठेवा

मकरेच्या पंचमेशात बुध, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. आठवड्याच्या सुरुवातीला रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीतील समस्या कमी होईल. चर्चा करताना तारतम्य सोडू नका. धंद्यात वाढ होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील कार्याला गती मिळेल. वक्तव्य जपून करा. मानप्रतिष्ठा वाढेल. शुभ दि.: 9, 10

कुंभ

सहनशीलता ठेवा

कुंभेच्या सुखेशात बुध, चंद्र-गुरू त्रिकोणयोग. मैत्रीत, नात्यात वाद होतील. नवीन परिचयावर भाळून न जाता निर्णय घ्या. नोकरीधंद्यात नम्रता, सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणत्याही व्यवहारात मुद्दे मांडताना तारतम्य ठेवा. मतभेद वाढतील. स्पर्धा कठीण आहे. शुभ दि.: 6, 10

मीन

कामांना चालना मिळेल

मीनेच्या पराक्रमात बुध, सूर्य-चंद्र त्रिकोणयोग. आठवडय़ाच्या शेवटी घरात, मैत्रीत गैरसमज होतील. नोकरीत वरिष्ठांना कमी लेखू नका. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील कामांना चालना मिळेल. नवीन परिचय उत्साहवर्धक, फायद्याचा ठरेल. प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबात सुखद चर्चा होईल. शुभ दि.: 5, 6