साप्ताहिक भविष्य – रविवार 5 ते शनिवार 11 फेब्रुवारी 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – चर्चेत यश मिळेल

मेषेच्या दशमेषात बुध, चंद्र, शुक्र प्रतियुती. आठवडय़ाच्या शेवटी तणाव, खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. व्यवसायात संधी मिळेल. वसुलीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चेत यश मिळेल. योजनांचा आढावा घ्या. दगदग वाढेल. कुटुंबात क्षुल्लक गैरसम होतील. स्पर्धेत यश मिळेल.
शुभ दिनांक : 7, 8

वृषभ – शेअर्समध्ये फायदा मिळेल

वृषभेच्या भाग्येषात बुध, चंद्र, गुरू प्रतियुती. प्रत्येक दिवस यशाचा ठरेल. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. धंद्यात लाभ होईल. शेअर्समध्ये फायदा मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाच्या योजनांना कार्याला वेगाने पूर्ण करा. खरेदीविक्रीत लाभ होईल. स्पर्धेत अव्वल राहाल. संसारातील कामे पूर्ण करा.
शुभ दिनांक : 6, 10

मिथुन – चौफेर सावध रहा

सूर्य, चंद्र षडाष्टक योग, मिथुनेच्या अष्टमेषात बुध. नम्रता, बुद्धिचातुर्य वापरून तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीत वरीष्ठांना दुखवू नका. अहंकार नको. धंद्यात सहनशीलता ठेवा. अनाठाई र्च टाळा. प्रवासात चौफेर सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज, तणाव, कुणालाही कमी लेखता काम करा.
शुभ दिनांक : 5, 6

कर्क – कामे रेंगाळत ठेवू नका

कर्केच्या सप्तमेषात बुध, प्लुटो बुध युती. मैत्रीत, संसारात गैरसमज होण्याची शक्यता. धंद्यात हिशेब नीट करा. नोकरीत वरिष्ठांना मदत करावी लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. गुप्त कारवाया होतील. तुम्ही विचलीत न होता काम करा. प्रतिष्ठा टिकेल. स्पर्धेत टिकून रहा.
शुभ दिनांक : 9, 10

सिंह- दगदग वाढेल

सिंहेच्या षष्ठेशात बुध, शुक्र हर्षल लाभयोग. कठोर प्रतिक्रिया केल्यास समस्या वाढतील. नोकरीधंद्यात परिश्रम, नम्रता यावर यश टिकेल. खिसा, पाकीट सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळचे मित्र मदत करतील. दगदग, धावपळ होईल. प्रकृतीची काळजी घ्या. वृद्धांची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 7, 8

कन्या – प्रतिस्पर्धी वाढतील

कन्या कन्येच्या पंचमेषात बुध, चंद्र, गुरू प्रतियुती आहे. गोड बोलणाऱया व्यक्तीपासून सावध रहा. नोकरीत वरिष्ठांना खूष कराल. परंतु प्रतिस्पर्धी वाढतील. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अतिमहत्वाची कामे पूर्ण करा. जवळच्या व्यक्ती गैरसमज पसरवतील.
शुभ दिनांक : 10, 11

तूळ- प्रसंगावधान ठेवा

तुळेच्या सुखस्थानात बुध, चंद्र, शुक्र प्रतियुती. आठवडय़ाच्या सुरुवातीला कामे करण्याचा प्रयत्न करा. तडजोड, संयम, युक्ती यावर यश संपादन करा. नोकरीत सहनशीलता ठेवा. धंद्यात चौफेर लक्ष द्या. प्रसंगावधान ठेवा. कोणतेही वक्तव्य करण्याचा उतावळेपणा नको. कामे वाढतील.
शुभ दिनांक : 6, 7

वृश्चिक – वरिष्ठांची मर्जी राखा
वृश्चिकेच्या पराक्रमात बुध, बुध प्लुटो युती. मैत्रीत, घरात थट्टामस्करी करताना काळजी घ्या. मुद्देसूद भाषणाचा प्रभाव राजकीय, सामाजिक क्षेत्रात पडेल. सन्मन मिळेल. नोकरीत वरीष्ठांची मर्जी राखा. धंद्यात काम वाढेल. नवे काम मिळेल. चर्चा यशस्वी होईल. नवे परिचय होतील. स्पर्धेत प्रगती कराल.
शुभ दिनांक : 7, 10

धनु – परिचय फायदेशीर ठरतील

धनुच्या धनेषात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. किरकोळ अडचणी, तणाव वाढेल. परंतु महत्त्वाची कामे होतील. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. नोकरीधंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात व्यापक स्वरूपाचे कार्य होईल. दिग्गज लोकांचा सहवास प्रेरणादायी ठरेल. यश मिळेल.
शुभ दिनांक : 7, 8

मकर – प्रकृतीची काळजी घ्या

स्वराशीत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती. व्यसन टाळा. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत बढती होईल. धंद्यात सुधारणा होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आत्मविश्वास वाढवणाऱया घटना घडतील. मैत्रीचे संबंध वाढतील. गैरसमज मिटवून टाका. वेगाने प्रगती करा.
शुभ दिनांक : 10, 11

कुंभ – रागावर ताबा ठेवा

कुंभेच्या व्ययेषात बुध, चंद्र, गुरू प्रतियुती. तुमच्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी प्रयत्न करा. दूरदृष्टिकोन ठेवा. यश खेचता येईल. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीधंदा टिकवा. पैसा सांभाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात टिकून राहा. गुप्त कारवाया वाढतील. प्रवासात सावध रहा. रागावर ताबा ठेवा.
शुभ दिनांक : 7, 8

मीन – फसगत टाळा

मीनेच्या एकादशात बुध, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. तुमच्या क्षेत्रात काम करताना फसगत टाळा. नवीन परिचय नीट पारखून घ्या. कोणतेही व्यसन नको. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गुप्त कारवाया होतील. आत्मविश्वासाने वागता येईल. वरिष्ठांबाबत गैरसमज दूर ठेवा.
शुभ दिनांक : 9, 10