साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 5 ते शनिवार 11 मार्च 2023

>> नीलिमा प्रधान

मेष: कामे मार्गी लावा
सूर्य, हर्षल लाभयोग, चंद्र, बुध प्रतियुती. आरोग्याची काळजी घ्या. कामे मार्गी लावण्याची जिद्द ठेवा. बुद्धिचातुर्य महत्त्वाचे आहे. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात सावध रहा. कर्ज वाढवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज लोकांशी चर्चा होईल. मानसन्मान वाढेल. डावपेच ठरवा मात्र स्वत:चे मत नोंदवू नका.
 शुभ दिनांकः 5, 11

वृषभ: नवी संधी मिळेल
चंद्र, गुरू प्रतियुती, बुध, मंगळ लाभयोग. प्रत्येक दिवस सत्कारणी लावा. नोकरीत प्रभाव पडेल. नवी संधी मिळेल. योग्य गुंतवणूक करा. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतŠचे स्थान भक्कम करा. वरिष्ठांच्या मनाप्रमाणे काम करा. संसारात आनंदी राहाल.
शुभ दिनांक : 8, 9

मिथुन: प्रत्येक दिवस यशदायी
चंद्र, गुरू प्रतियुती, बुध, हर्षल लाभयोग. प्रत्येक दिवस यशदायी ठरेल. कठीण महत्त्वाची कामे करून घ्या. रागावर ताबा ठेवल्यास कोणतेही काम अशक्य नाही. नोकरीधंद्यात मनाप्रमाणे वसुली करा. कर्जाचे काम होईल. सामाजिक क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करा. योजना गतिमान बनवा. स्पर्धेत जिंकाल.
शुभ दिनांक : 5, 11

कर्क: कामात चूक टाळा
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, शुक्र, मंगळ लाभयोग. अहंकार, अतिशयोक्ती न करता तुमच्या क्षेत्रात काम करा. धंद्यात वाढ, वसुली करा. अरेरावी नको. नोकरीच्या कामात चूक टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांना कमी लेखू नका. कायदा पाळा. प्रकृतीची काळजी घ्या. कुटुंबात चिंता सतावेल.
शुभ दिनांक : 8, 9

सिंह: आत्मविश्वास वाढेल
सूर्य, हर्षल लाभयोग, चंद्र, बुध प्रतियुती. सोमवार पासून अनेक कामांना गती मिळेल. आत्मविश्वास वाढेल. विचारांना चालना देणारी घटना घडेल. नोकरीत वरीष्ठांची मर्जी राहील. धंद्यात जास्त मोह नको. विरोधकांवर नजर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपापसातील नाराजी दूर करता येईल.
शुभ दिनांक : 8, 9

कन्या: वक्तव्य जपून करा
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, शुक्र, मंगळ लाभयोग. होळी, धुलीवंदनाच्या दिवशी कोणतीही चूक करू नका. कायदा पाळा. वक्तव्य जपून करा. नोकरी टिकवा. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांसोबत मतभेद होतील. सहनशीलता ठेवा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ दिनांक : 9, 11

तूळ: रागावर ताबा ठेवा
सूर्य, हर्षल लाभयोग, चंद्र, बुध प्रतियुती. सप्ताहाच्या मध्यावर राग वाढवणारी घटना घडेल. प्रवासात, काम करताना सावध रहा. नोकरीत प्रभाव वाढेल. सहकारी गुप्त कारवाया करतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळेल. भावनेच्या आहारी जाऊ नका.
शुभ दिनांक : 5, 11

वृश्चिक: शब्द जपून वापरा
चंद्र, गुरू प्रतियुती, शुक्र, मंगळ लाभयोग. कोणताही प्रश्न प्रेमाने, आत्मविश्वासाने सोडवा. नोकरीत काम वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करतील. शब्द जपून वापरा. कल्पनाशक्तीचा योग्य वापर करा. नवीन परिचय होतील.
शुभ दिनांकः 5, 9

धनु: अधिकार लाभतील
सूर्य, हर्षल लाभयोग, चंद्र, बुध प्रतियुती. सोमवारपासून अनेक कामांना गती मिळेल. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. कठीण कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार मिळेल. सहकारी क्षुल्लक प्रश्न निर्माण करतील. तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. स्पर्धेत पुढे
शुभ दिनांक : 8,11

मकर: अतिरेक नको
चंद्र, गुरू प्रतियुती, शुक्र, मंगळ लाभयोग. धुलीवंदनाच्या दिवशी कायदा पाळा. अतिरेक नको. नोकरीतील समस्या युक्तीने सोडवा. घरातील व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वेगाने काम करा. योजनाबद्ध रचना करा. आर्थिक साहाय्य मिळेल.
शुभ दिनांक : 9,11

कुंभ: नोकरीत प्रगती होईल
बुध बुध, हर्षल लाभयोग, चंद्र, शुक्र प्रतियुती कोणताही प्रश्न बुद्धिचातुर्याने, स्नेहभावनेने सोडवा. नोकरीत प्रगती होईल. बदल शक्य होईल. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्देसूद प्रभावी भाषण कराल. दिग्गज लोकांचे परिचय प्रेरणादायक ठरतील. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात यश मिळवाल.
शुभ दिनांक : 10, 11

मीन: संयम बाळगा
चंद्र, गुरू प्रतियुती, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. सहनशीलता, संयम ढळू देऊ नका. परीक्षेचा कालावधी आहे. गुरूकृपा असताना विचलित होऊ नका. प्रकृतीची काळजी घ्या. यशाची वाट पहा. कार्य करत रहा. नोकरीधंदा टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बेताल वक्तव्य टाळा. वरीष्ठांना कमी लेखू नका.
शुभ दिनांक : 8, 9