साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 12 नोव्हेंबर ते शनिवार 18 नोव्हेंबर 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – कठोर बोलणे टाळा

मेषेच्या अष्टमेषात मंगळ, सूर्य. शुक्र, गुरू षडाष्टक योग. शारीरिक, मानसिक तणाव राहील. कठोर बोलणे टाळा. दिवाळीचा सण अंधारातून प्रकाशाकडे नेणारा ठरेल.  नरक चतुर्दशी उत्साहाने साजरा करा. नोकरीत दगदग होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. धंद्यात अस्थिरता जाणवेल. उत्सवात धाडसी कृत्य टाळा. शुभ दिनांक : 12, 18

वृषभ – समस्येवर उपाय मिळेल

वृषभेच्या सप्तमेषात मंगळ, रवि. बुध, शुक्र लाभयोग. दिपावली शुभचिंतनाची ठरेल. पाडव्यापासून समस्येवर उपाय शोधता येईल. कोणतेही धाडस नको. दुखापत टाळा. नोकरी, धंद्यात तणाव जाणवेल. चिंता दूर होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज दूर सारा. नवीन परिचय प्रेरणादायक ठरतील. शुभ दिनांक : 14, 15

मिथुन – संयम बाळगा

मिथुनेच्या षष्ठेशात मंगळ, रवि. चंद्रगुरू त्रिकोणयोग. नरक चर्तुदशी, लक्ष्मीपूजन उत्साहाने साजरी कराल. क्षुल्लक तणाव निर्माण होईल. कुणालाही कमी लेखू नका. कायद्याचे पालन करा. नोकरी, धंद्यात अशांतता वाटेल. संयम ठेवा. प्रवासात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनहिताच्या कामात पुढे राहाल. शुभ दिनांक : 12, 13

कर्क – दीपावली उत्साहाची

कर्केच्या पंचमेषात मंगळ, रवि. बुध, शुक्र लाभयोग. दिपावली उत्साहाची, नव्या दिशेने नेणारी ठरेल. नोकरी, धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळेल. जीवनाला नवे वळण देणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल. नवे पद मिळेल. जनसंपर्क वाढेल. प्रगती कराल. शुभ समाचार मिळेल. शुभ दिनांक:14, 15

सिंह – रागावर ताबा ठेवा

सिंहेच्या चतुर्थात मंगळ, रवि. चंद्र, गुरू त्रिकोणयोग. मनावर दडपण असले तरी दिपावली साजरी केली पाहिजे. नवीन परिचय दिशादर्शक ठरतील. नोकरीत सावधपणे काम करा. धंद्यात किरकोळ तणाव जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्यानुसार वक्तव्य करा. रागावर ताबा ठेवा. नव्या कार्याची सुरूवात होईल. शुभ दिनांक:12,17

कन्या – प्रत्येक दिवस आनंदाचा

कन्येच्या पराक्रमात मंगळ, सूर्य. बुध, शुक्र लाभयोग. रेंगाळलेली कामे मार्गी लावा. दिपावलीच्या उत्साहाला आत्मविश्वासाची जोड असेल. प्रत्येक दिवस आनंदाचा ठरेल. नव्या कार्याचा आरंभ होईल. नोकरी, धंद्यातील तणाव कमी होईल. प्रकृतीत सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व, प्रतिष्इा वाढेल. शुभ दिनांक: 12, 14

तूळ – नवी जबाबदारी मिळेल

तुळेच्या धनेषात मंगळ, रवि. चंद्र, गुरू त्रिकोणयोग. दिपावलीचा प्रत्येक दिवस आनंदाचा ठरेल. जवळच्या व्यक्ती अडचणी निर्माण करण्याची शक्यता. नोकरी, धंद्यात प्रगती होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरीष्ठांच्या अपेक्षा वाढतील. नवी जबाबदारी मिळेल. मौल्यवान वस्तू जपा. व्यवहारात लाभ होईल. शुभ दिनांक : 14, 15

वृश्चिक – योजना गतिमान होतील

स्वराशीत मंगळ, रवि. बुध, शुक्र लाभयोग. रविवार, सोमवार तणाव राहील. आत्मविश्वासात भर टाकणारी घटना घडेल. कोणतेही काम करताना दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. नोकरी, धंद्यातील तणाव कमी होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजना गतिमान होतील. नवीन परिचय लाभदायक. शुभ दिनांक : 16,17

धनु – प्रवासात सावध रहा

धनुच्या व्ययेषात मंगळ, रवि. चंद्र, गुरू त्रिकोणयोग. दिपावली यथासांग साजरी करा. प्रवासात सावध रहा. नाकरी, धंद्यात सौम्य धोरण ठेवा. कायदा पाळून कोणतेही वक्तव्य करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अस्थिरता, तणाव जाणवेल. तटस्थ धोरण हिताचे. समस्या तात्पुरत्या असतील. घरातील कामे वाढतील. शुभ दिनांक :12, 18

मकर – नोकरीत प्रभाव राहील

मकरेच्या एकादशात मंगळ, रवि. बुध, शुक्र लाभयोग. दिपावली आनंदात साजरी कराल. क्षुल्लक गैरसमज होईल. नोकरीत प्रभाव राहील. काम वाढेल. धंद्यात प्रेरणादायक वातावरण राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच उघड करू नका. अडचणींवर मात करता येईल. सुखद वातावरण राहील. शुभ दिनांक : 12, 14

कुंभ – प्रतिष्ठा वाढेल

कुंभेच्य दशमेषात मंगळ, रवि, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. दिपावली आनंदात साजरी करा. दिपावली दिशा देणारी ठरेल. प्रत्येक दिवस महत्त्वाचा असेल. धंद्यात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नवीन परिचयावर विश्वास ठेवा. प्रतिष्ठा, मान वाढेल. मुद्दे प्रभावी ठरतील. कुटुंबात क्षुल्लक नाराजी असेल. शुभ दिनांक: 12, 14

मीन – प्रेरणादायी दीपावली

मीनेच्या भाग्येषात मंगळ, रवि. बुध, शुक्र लाभ. सप्ताहाच्या सुरूवातीला सावधपणे बोला. कृती करा. दिवाळी पाडव्यापासून कामे होतील. प्रेरणादायक घटना घडतील. थकबाकी मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरीष्ठ तुमच्या हिताचा निर्णय घेण्याची शक्यता. लोकसंग्रह वाढेल.  कामे मार्गी लागतील. शुभ दिनांक : 17, 18