आठवड्याचे भविष्य – 7 ऑक्टोबर 2018 ते 13 ऑक्टोबर 2018

120

>> नीलिमा प्रधान

मेष – व्यवसायात नवी संधी
मेषेच्या अष्टमेषात गुरू ग्रहाचे राश्यांतर होत आहे. चंद्र-बुध युती होत आहे. व्यवसायात मोठी संधी येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्यावर टीकात्मक चर्चा होईल. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा. मैत्रीपूर्ण चर्चा सफल होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबात जबाबदारी वाढेल. संधीची वाट पाहा. शुभ दि. 10, 15

वृषभ – विचारपूर्वक निर्णय घ्या
वृषभेच्या सप्तमेषात गुरू ग्रहाचे राश्यांतर होत आहे. बुध-हर्षल युती होत आहे. व्यवसायाला अचानक कलाटणी मिळेल. किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करा. विचारपूर्वक निर्णय घेता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा प्रकाश दिसेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. शुभ दि. 12, 13

मिथुन – मनोबल राखा
मिथुनेच्या षष्ठस्थानात गुरू ग्रह प्रवेश करीत आहे. बुध-हर्षल प्रतियुती होत आहे. व्यवसायात घेतलेले काम याच आठवडय़ात पूर्ण करा. शेअर्समध्ये निर्णय चुकेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत वरिष्ठांच्या मनात गैरसमज होऊ शकतो. परदेशात जाण्याचा योग येईल. मोठय़ांचे सहकार्य मिळेल. शुभ दि. 7, 10

कर्क – सामाजिक कार्यात लक्ष द्या
कर्केच्या पंचमेषात गुरू महाराजांचा प्रवेश होत आहे. चंद्र-मंगळ केंद्रयोग होत आहे. वृश्चिक राशीत प्रवेश करणारा गुरू तुमच्या समस्या दूर करेल. व्यवसायात मोठय़ा प्रमाणात उलाढाल होईल. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न सोडवता येईल. सामाजिक क्षेत्रांत लोकांच्या हिताकडे लक्ष पुरवा. शुभ दि. 12, 13

सिंह – सावध राहा
वृश्चिक राशीत गुरू ग्रहाचे राश्यांतर होत आहे. चंद्र-बुध युती होत आहे. आठवडय़ाचा प्रत्येक दिवस तुम्ही महत्त्वाचे काम करू शकाल. व्यवसायात करार करताना समजून घ्या. जमीन विक्रीचे काम होऊ शकेल. सामाजिक क्षेत्रांत चर्चा करून मोठा निर्णय घ्या. प्रवासात सावध राहा. शुभ दि. 7, 9

कन्या – नव्या कार्याचा शुभारंभ
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर नव्या कार्याचा आरंभ करता येईल. वृश्चिक राशीत म्हणजे कन्येच्या पराक्रमात गुरू ग्रह प्रवेश करीत आहे. व्यापक स्वरूपात तुमचे कार्य होईल. शेअर्समध्ये फायदा होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत डावपेच टाळा. जुने स्नेही तुमच्याकडे आकर्षित होतील. शुभ दि. 10, 12

तूळ – संमिश्र स्वरूपाचा काळ
तुळेच्या धनेषात गुरू महाराज 11 ऑक्टोबर रोजी प्रवेश करीत आहे. बुध-हर्षल प्रतियुती होत आहे. व्यवसायातील अडलेले काम शुक्रवारपासून मार्गी लागेल. मोठे कंत्राट मिळेल. शेअर्समध्ये मात्र सावधपणे गुंतवणूक करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत संमिश्र स्वरूपाचे वातावरण राहील. शुभ दि. 12, 13

वृश्चिक – गुंतवणुकीची घाई नको
वृश्चिक राशीत गुरू महाराज नवरात्रीच्या दुसऱया दिवशी प्रवेश करीत आहे. श्री अंबामातेच्या कृपेने तुमची इच्छा पूर्ण होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्या विरोधात लोकांचा उद्रेक वाढेल. धंद्यात गुंतवणुकीची घाई करू नका. शेअर्समध्ये अंदाज चुकेल. कुटुंबात किरकोळ मतभेद होतील. शुभ दि. 12, 13

धनु – निर्णयात सावधगिरी बाळगा
धनु राशीला साडेसातीचे मध्य पर्व सुरू आहे. 11 ऑक्टोबर रोजी गुरू महाराज धनुच्या व्ययस्थानात प्रवेश करीत आहे. धंद्यात संधी मिळेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत महत्त्वाची चर्चा करा. कुटुंबात एखादा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे असा आग्रह होईल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. शुभ दि. 7, 10

मकर – योजनांना गती मिळेल
मकरेच्या एकादशात गुरू ग्रह 11 ऑक्टोबर रोजी प्रवेश करीत आहे. साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. नवरात्री उत्सवात तुम्ही एकाग्रतेने कुलदेवीची आराधना करा. तुमचे स्वप्न पूर्ण होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तणाव होईल. तुमच्या योजना वेगवान होतील. लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करा. शुभ दि. 9, 10

कुंभ – प्रगतीची संधी मिळेल
कुंभ राशीच्या दशमेषात गुरू ग्रहाचे राश्यांतर होत आहे. बुध-शनी लाभयोग होत आहे. व्यवसायात सुधारणा होईल. भागीदारातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत धावपळ होईल. कुलदेवीची उपासना कार्यात मोठे यश देईल. प्रगतीची नवीन संधी मिळेल. शुभ दि. 10, 12

मीन – शेअर्समध्ये लाभ
मीन राशीच्या भाग्यात गुरू महाराज 11 ऑक्टोबर रोजी प्रवेश करीत आहे. बुध-हर्षल प्रतियुती होत आहे. व्यवसायात फार मोठा फायदा होईल. मूळ कुंडलीच्या योगानुसार फरक होईल. शेअर्समध्ये लाभ होईल. योजना मार्गी लावा. कुटुंबात वाटाघाटीत, खर्चात ताणतणाव होईल. शुभ दि. 12, 13

आपली प्रतिक्रिया द्या