साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 7 जून ते शनिवार 13 जून 2020

>> नीलिमा प्रधान

डावपेच यशस्वी ठरतील

मेष : चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र, शुक्र त्रिकोणयोग होत आहे. या आठवड्यात तुमच्या क्षेत्रात यश मिळेल. व्यवसाय, नोकरीतील समस्या सोडवाल. मोठे कंत्राट मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात घेतलेला निर्णय प्रभावी ठरेल. डावपेच यशस्वी ठरतील. कला-साहित्यात नावीन्य शोधा.
शुभ दिनांक – 8, 9

वरिष्ठांवर प्रभाव पडेल

वृषभ : चंद्र गुरु युती, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. अडचणींवर मात करून तुमच्या क्षेत्रात प्रगती कराल. वरिष्ठांवर प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता लाभेल. नवीन परिचय होतील. कला साहित्यात विचारांना चालना मिळेल. कठीण कामं लवकर पूर्ण करा.
शुभ दिनांक – 9, 10

प्रश्न गांभीर्याने सोडवा

मिथुन – चंद्र बुध प्रतियुती, चंद्र मंगळ लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अवास्तव अपेक्षा नको. जनहिताचा प्रश्न गांभीर्याने सोडवा. व्यवसायात वादविवाद न करता मिळालेल्या संधीत खूश राहा. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला.
शुभ दिनांक – 7, 11

प्रगतीची संधी मिळेल

कर्क : चंद्र, गुरु युती, सूर्य चंद्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. रागावर ताबा ठेवा. व्यवसायात चर्चेपेक्षा कृतीला महत्त्व द्या. नोकरीत कामाचे कौतुक होईल परंतु कामाचा ताण वाढेल. कला साहित्यात विशेष यश मिळेल.
शुभ दिनांक – 9, 10

कठीण प्रसंगावर मात कराल

सिंह : चंद्र, बुध युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय. सामाजिक क्षेत्रात कठीण प्रसंगावर मात करण्याची तुमची वृत्ती कौतुकास्पद ठरेल. लोकप्रियता वाढेल. व्यवसायात मोठे काम मिळेल, परंतु दिशाभूल करणाऱयांपासून सावध राहा. कला-साहित्यात सन्मान लाभेल.
शुभ दिनांक – 7, 8

व्यवसायात प्रगती कराल

कन्या : चंद्र, गुरु युती सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. कठीण वाटणारे काम लवकर करून घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात नव्या डावपेचांना संधी देता येईल. व्यवसायात प्रगती कराल. नोकरीत विरोध मोडून काढाल. वाटाघाटीचा प्रश्न निकालात काढता येईल.
शुभ दिनांक – 9, 10

उतावळेपणा दूर ठेवा

तूळ : चंद्र, बुध प्रतियुती सूर्य, चंद्र षडाष्टक योग होत आहे. उतावळेपणा दूर ठेवत कामाला सुरुवात करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बदनामी करण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. नवीन ओळखीवर जास्त विश्वास ठेवू नका. कायदा पाळा.
शुभ दिनांक – 7, 8

कार्याचा गवगवा होईल

वृश्चिक : चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठsत भर पडेल. तुमच्या कार्याचा गवगवा होईल. नोकरीत महत्त्व वाढेल. व्यवसायात ओळखीचा उपयोग करून घेता येईल. कला, लेखन यात नवीन सुरुवात कराल.
शुभ दिनांक – 8, 9

जनहिताला महत्त्व द्या

धनु : चंद्र, बुध प्रतियुती, सूर्य चंद्र षडाष्टक योग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जनहिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्याल. प्रगतीची संधी लाभेल. व्यवसायात तडजोड करावी लागेल. नोकरीत इतरांना मदत करावी लागेल. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक – 9, 10

दडपण कमी होईल

मकर : चंद्र, गुरु युती, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. साडेसाती सुरू आहे. तुमच्यावरील दडपण काही अंशी कमी होईल. राजकीय, सामजिक क्षेत्रात तुमचा मुद्दा वादग्रस्त ठरेल. नोकरीत काम वाढले तरी यशस्वी व्हाल. कलासाहित्यात कल्पनाशक्तीला वाव मिळेल.
शुभ दिनांक – 12, 13

समस्या संयमाने सोडवा

कुंभ : चंद्र, बुध प्रतियुती, चंद्र हर्षल त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. प्रवासात सावध रहा. नोकरीतील समस्या संयमाने सोडवा. कुटुंबात नाराजी होऊ शकते. चिंता वाटेल. मैत्रीत गैरसमज होतील.
शुभ दिनांक – 7, 8

शेअर्समध्ये लाभ होईल

मीन : सूर्य, चंद्र त्रिकोणयोग चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करा. रागामुळे चांगले काम बिघडू शकते. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. शेअर्समध्ये लाभ होईल. व्यवसायात सुधारणा होईल तर नोकरीत ताण वाढेल.
शुभ दिनांक – 7, 9

आपली प्रतिक्रिया द्या