साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 31 मे ते शनिवार 6 जून 2020

>> नीलिमा प्रधान

मेष
अडचणी निर्माण होतील
चंद्र, गुरु त्रिकोणयोग, रवी शुक्र युती होत आहे. धावपळ, दगदग होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. नोकरी, व्यवसायात अडचणी निर्माण होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. डावपेच केले जातील मात्र संयम बाळगा. कार्यात गुप्तता ठेवा.
शुभ दिनांक : 2, 3

वृषभ
क्षुल्लक वाद टाळा
रवी शुक्र युती, चंद्र गुरु लाभयोग होत आहे. क्षेत्र कोणतेही असो महत्त्वाचे काम करून घ्या. व्यवसायात मनाप्रमाणे प्रगती होईल. परिचयातून मोठे कंत्राट मिळेल. क्षुल्लक वादाकडे जास्त लक्ष देऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रयत्नांचा जोर वाढवा. जनहिताच्या कार्यात पुढे राहाल.
शुभ दिनांक : 31, 1

मिथुन
अतिउत्साह दूर ठेवा
रवी, शुक्र युती, बुध हर्षल लाभयोग होत आहे. गुप्त कारवायांना कमी समजू नका. अतिउत्साह दिशाभूल करणारा ठरेल. नोकरीत मनस्तापाला सामोरे जावे लागेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात इतरांचे धोरण ऐकून घ्या. स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 2, 3

कर्क
प्रगतिकारक आठवडा
चंद्र गुरु त्रिकोणयोग, रवी शुक्र युती होत आहे. प्रत्येक कार्यात प्रगती होईल. महत्त्वाचा निर्णय घ्या. शेअर्समध्ये लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अधिकार वाढण्याची शक्यता. रागावर नियंत्रण ठेवा. जनहिताच्या कार्यात नावलौकिक वाढेल.
शुभ दिनांक : 31, 1

सिंह
नवी दिशा मिळेल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, सूर्य-शुक्र युती होत आहे. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत वरि… किचकट काम देतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बोलण्या-वागण्याचे कौतुक होईल. मानप्रति…ा वाढेल. कला-साहित्याला नवी दिशा मिळेल.
शुभ दिनांक : 1, 3

कन्या
मनावरील दडपण कमी होईल
रवी शुक्र युती, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. मनावरील दडपण कमी झाल्याचे समाधान मिळेल. तुमच्या क्षेत्रात विचारांना चालना मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात डावपेच यशस्वी होतील. नव्या योजनांना गती येईल. स्वत:च्या कार्यावर लक्ष केंद्रित करा. प्रति…ा वाढेल.
शुभ दिनांक : 1, 3

तूळ
दिशाभूल होण्याची शक्यता
शुक्र, मंगळ केंद्रयोग, बुध, हर्षल लाभयोग होत आहे. नोकरीत दुर्लक्ष नको. व्यवसायात खर्च वाढेल. खोटय़ा आश्वासनांना बळी पडू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिशाभूल करणारे लोक ओळखा. मित्र व शत्रू दोघांनाही तटस्थपणे हाताळा. अरेरावी दूर ठेवा.
शुभ दिनांक : 3, 4

वृश्चिक
व्यावहारिक दृष्टिकोन बाळगा
चंद्र, गुरु त्रिकोणयोग, सूर्य, शुक्र युती होत आहे. आळस केल्यास मोठी संधी हातून जाईल. नोकरीत चातुर्याने बोला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा लागेल. तुमच्या निर्णयाचे इतर लोक अनुकरण करतील.
शुभ दिनांक : 31, 1

धनु
निर्णय चुकण्याची शक्यता
शुक्र, मंगळ केंद्रयोग, बुध हर्षल लाभयोग होत आहे. प्रकृतीची काटेकोरपणे काळजी घ्या. तुमचा एखादा निर्णय चुकण्याची शक्यता. व्यवसायात अनाठायी खर्च होऊ शकतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात ठेवा. वरि…ांचा सल्ला घ्या.
शुभ दिनांक : 31, 1

मकर
गुंतवणूक फायदेशीर ठरेल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, रवी, शुक्र युती होत आहे. प्रत्येक दिवस प्रगतिकारक ठरेल. शेअर्समधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याची व्याप्ती वाढेल. समोर आलेल्या संधीचा लाभ करून घ्या. कला-साहित्यात नवा विचार कराल.
शुभ दिनांक : 2, 3

कुंभ
कामाचा व्याप वाढेल
रवी, शुक्र युती, बुध, हर्षल लाभयोग होत आहे. व्यवसायात, नोकरीत समस्या येतील. कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वत: लक्ष द्या. सहकारी, नेते यांच्या मदतीची अपेक्षा ठेवू नका. कला-लेखन साहित्य याला वेग मिळेल.
शुभ दिनांक : 2, 3

मीन
कार्याची प्रशंसा होईल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, सूर्य, शुक्र युती होत आहे. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत तुमच्या कार्याची प्रशंसा होईल. इतरांना केलेली मदत कौतुकास्पद ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात ठरविलेले कार्य पूर्ण कराल. कुटुंबात शुभ समाचार मिळेल.
शुभ दिनांक : 31, 1

आपली प्रतिक्रिया द्या