आठवड्याचे भविष्य

मानसी इनामदार

समस्या – मुलांना परीक्षेत उत्तम यश प्राप्त व्हावे म्हणून…

तोडगा – पहाटे उठून अभ्यास करावा आणि रोज न चुकता विद्यास्तोत्र म्हणावे. (विद्यास्तोत्राचे पुस्तक विक्रेत्यांकडे मिळते.

मेष – सुखद काळ

आरोग्यदायी आठवडा असेच येणाऱया दिवसांचे वर्णन करावे लागेल. तुम्ही वेळेचे नियोजन उत्तम करता. त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी होणार आहे. फक्त सहकाऱयांशी सुसंवाद ठेवा. त्यामुळे काम सुलभ, सोपे होईल. पुटुंबासमवेत काळ सुखद ठरेल. भगवा रंग जवळ बाळगा..शुभ आहार…ताजी फळे, पिच, मोसंबी

वृषभ – कष्टांचे फळ

उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. त्यामुळे उत्साहाचे वातावरण असेल. तुम्ही केलेली गुंतवणूक कामी येईल. जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरेल. नात्यातील गोडवा वाढेल. केलेल्या कष्टांचे फळ चाखाल. गुलाबाचा लाल रंग महत्त्वाचा. घरात, कामाच्या ठिकाणी लाल गुलाबाची ताजी फुले ठेवा.शुभ आहार…चॉकलेट, आल्याचा चहा

मिथुन – स्वर्गीय सुख

कामात दुहेरी फायदा होईल. हाती घेतलेले प्रकल्प यशस्वी होतील. व्यक्तिगत आयुष्यातही सुखाच्या गोष्टी घडतील. नवे प्रेमसंबंध जुळतील. त्यामुळे स्वर्गीय सुखाची प्राप्ती होईल. आत्मविश्वास वाढेल. मुलांकडून एखादी थरारक बातमी समजेल. निळा रंग जवळ बाळगा..शुभ आहार…साखरेचे पदार्थ, करंजी

 कर्क- फायदा होईल

प्रिय व्यक्तीसोबत मतभेद होतील, पण ते मिटतीलही. एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या माणसांना जपायचे असते. त्यांना दुखवून चालण्यासारखे नसते. मुलांना तुमची गरज आहे. त्यांच्यासाठी उभे रहा. पांढरा रंग जवळ बाळगा. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल. फक्त सावध निर्णय घ्या…शुभ आहार…दही, दूध

सिंह – संयम महत्त्वाचा

घरात उगाच गंभीर परिस्थिती निर्माण होईल. रागावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध काही गोष्टी घडतील, पण त्याकडे दुर्लक्ष करा. तुमच्या आनंदी स्वभावाने सगळ्यांची मने जिंकून घ्याल. कोणतेही बेजबाबदार पृत्य करू नका. संयम महत्त्वाचा ठरेल. पिवळा रंग जवळ बाळगा..शुभ आहार…पुरणपोळी, कटाची आमटी

कन्या – नवी खरेदी

या आठवडय़ात गरजेच्या वस्तूंची खरेदी होईल. आर्थिक नियंत्रण चांगले ठेवाल. कोणत्याही गोष्टीची ददात पडणार नाही. आरोग्याकडे लक्ष द्या. गुडघ्यांची काळजी घ्या. मुलांसाठी कपडय़ांची खरेदी कराल. त्यामुळे मुले खुश होतील. उगाच ताण घेऊ नका. राखाडी रंग जवळ ठेवा…शुभ आहार…कडधान्ये, मटकी

 तूळ – प्रतिष्ठा वाढेल

काहीही घडले तरी संयम बाळगा. तुमचे निरंतर प्रयत्न आणि समजूतदारपणा यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहणार आहे. बाप्पा घरात आनंदवार्ता घेऊन येतील. एखाद्या मोठय़ा संस्थेसोबत काम करण्याचा योग येईल. त्यामुळे समाजात मान, प्रतिष्ठा वाढेल. आमरशी रंग जवळ बाळगा….शुभ आहार…नारळाचे पदार्थ, गूळ

वृश्चिक – आनंदवार्ता समजेल

अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळाल. कोणालाही दुखवू नका. गणेशाच्या आगमनाची तयारी मनाजोगी होईल. त्यामुळे मन प्रसन्न राहील. आनंदवार्ता समजतील. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. नव्या गुंतवणुकीचा विचार करा. फायदा होईल. काळा रंग महत्त्वाचा…शुभ आहार…पंचामृत, वरणभात

धनु – उत्सवाचे वातावरण

उगाच चिंता आणि काळजी करू नका. सगळे योग्य वेळी होत असते. आवश्यक गोष्टींची खरेदी लगेच करून टाका. घरात उत्सवाचे वातावरण राहील. जोडीदाराचे मन सांभाळा. बाहेरगावी जाण्याचा योग येईल. त्यामुळे मनःस्थिती सुधारेल. हिरा खरेदी कराल. चंदेरी रंग जवळ बाळगा….शुभ आहार…खोबरे, साखर

मकर – एकत्र कुटुंब

मनोरंजनावर पैसे आणि वेळ खर्च होईल. त्यामुळे ताण वाढेल, पण नुकसान होणार नाही. बाप्पाचा उत्सव मजेत साजरा कराल. पुटुंबातील सदस्य एकत्र जमतील. त्यामुळे घरातील महिलांना थोडा त्रास होईल, पण वातावरणातील प्रसन्नतेमुळे तो जाणवणार नाही. शेंदरी रंग जवळ बाळगा…शुभ आहार…तांदूळ, नारळाचा रस

कुंभ – जोडीदारावर प्रेम

नवे मित्र जोडाल. त्यांची तुमच्या व्यवसायात विशेष मदत होईल. कामाचा वेग वाढवा. वेळ महत्त्वाची ठरेल. पूर्वी केलेली गुंतवणूक आता कामी येईल. जोडीदाराच्या काही गोष्टी खटकतील, पण तुमचे प्रेम वरचढ ठरेल. हट्ट पुरवाल. त्यातून मानसिक समाधान लाभेल. हिरवा रंग महत्त्वाचा….शुभ आहार…बटाटावडा, भजी

मीन – बाप्पाचे स्वागत

सहजीवनात सुखी व्हाल. आजारपणावर मात कराल. या आठवडय़ात प्रयत्नात कसूर नको. नफा होईल. वास्तूविषयक कामे होतील. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावा. घरात सकारात्मक ऊर्जा खेळेल. गणेशाचे स्वागत कराल. नव्या वस्तूंची खरेदी कराल. शेंदरी रंग जवळ बाळगा….शुभ आहार…मोदक