Tips : एक ग्लास घरगुती ज्युस तुमची ढेरी कमी करेल

2014

सध्या पोटाचा वाढत जाणारा घेर ही एक मोठी समस्या बनली आहे. पोटाचा घेर कमी करण्यासाठी म्हणजे ढेरी कमी करण्यासाठी बाजारात अनेक पेय (ज्यूस) उपलब्ध आहेत. मात्र अनेकदा त्याचे साईड इफेक्ट्स देखील दिसून येतात अशावेळी घरातील वडीलधारी मंडळी आपल्याला घरगुती उपाय सुचवतात. ढेरी कमी करण्यासाठी एक घरगुती उपाय सांगितला जातो, तो आम्ही तुम्हाला सांगत आहोत. मात्र हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

ढेरी कमी करण्याचे उपाय म्हणजे शरीराची चरबी कमी करणे. वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग वजन कमी करण्याचे पेय मानला जातो, घरगुती उपाय करून आपल्याला उत्कृष्ट परिणाम देखील मिळू शकतात.

येथे दोन गोष्टींनी बनविलेले एक नैसर्गिक पेय आहे, जे आपल्याला काही काळ सेवन करून आश्चर्यकारक फायदे मिळवून देऊ शकतात. असे बरेच गुणधर्म त्यात आढळतात, जे चरबी कमी करण्यासाठी कार्य करतात. बरेच लोक वजन कमी कसे करावे असा प्रश्न करतात? किंवा वजन कमी करण्याच्या कोणत्या पद्धती आहेत? असे विचारात अशा लोकांसाठी वजन कमी करण्याचा उपाय येथे सांगितला आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी घरगुती औषधांमध्ये हे पेय देखील समाविष्ट केले जाऊ शकते.

सध्या घरात अनेक महिने राहिल्यामुळे वजन खूपच वेगाने वाढत आहे, त्यामुळे बरेच लोक नैसर्गिक मार्गाने वजन कमी करण्यासाठी पुढे येण्यास सुरुवात करत आहेत. हे आयुर्वेदिक पेय असून दिवसातून एकदा घेतले तरी पुरेसे आहे. लिंबू आणि गुळापासून बनविलेले हे पेय वजन कमी करण्यावर चांगला परिणाम दर्शवू शकतं.

गूळ आणि लिंबाचा वापर विविध पदार्थ बनवताना केला जातो. हे दोन्हीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. हे दोन्ही पदार्थ एकत्र केल्याने शरीरावर व्हिटॅमिन सी भरलेलं एक विशेष पेय मिळतं. यात झिंक आणि अँटी-ऑक्सिडेंट देखील आहेत. या पेयामुळे कॅलरी योग्य प्रमाण वाढवून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. गूळ आणि लिंबाचे पाणी सेवन केल्यास आपली पाचन शक्ती चांगली होऊ शकते आणि पोटाची चरबी कमी होण्यास देखील खूप मदत होऊ शकते.

हे पेय तयार करण्याची कृती

कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. गूळाचा तुकडा घाला. चमच्याच्या मदतीने हे मिश्रण चांगले ढवळून घ्या. गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत ढवळा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पेय घेतल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.

मात्र हा उपाय करून पाहण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. वृत्तपत्राचे संकेतस्थळ याची जबाबदारी घेत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या