स्वागत दिवाळी अंकांचे – ६

137

चिंतन आदेश

चिंतन आदेशचा अंक प्रेम या विषयाला वाहिलेला आहे. सुरेश द्वादशीवार, अरविंद गोखले, नंदिनी आत्मसिद्ध, श्रद्धा बेलसरे-खारकर, सुरेशचंद्र पाध्ये आदींनी प्रेम हा विषय फुलवला आहे. शास्त्र्ाज्ञ मंडळींचे त्यांच्या कुटुंबावरचे, अर्धांगिनीवरील प्रेम डॉ. अनिल लचके यांनी लिहिले आहे. प्रदीप निफाडकर यांनी प्रेमाची स्वर्गात रंगलेली मैफल फँटसीच्या स्वरूपात जमवून आणलेय. त्यामध्ये सुरेश भट, मीर- गालिब, फैज, फिराक गोरखपुरी यांच्या शायरी वाचावयास मिळतात. डॉ. सदानंद मोरे यांची वादळाची फुले झेलताना, इंद्रजित भालेराव यांची फिट्टमफाट, कविता क्षीरसागर यांची प्रेमाचे व्याकरण, प्रेम एक अनुभूती ही मिताली लिमये यांची कविता आणि अन्य कविता वाचकांच्या नक्कीच पसंतीत उतरतील.

संपादक अभिनंदन थोरात

मूल्य १०० रु., पृष्ठ ३२२

धर्मभास्कर

धर्मभास्करच्या दीपावली विशेषांकात नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला आहे. महिला शक्तीची विविध रुपे मांडली आहेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी, लेफ्टनंट स्वाती महाडीक, इंद्रा नुई, विजयालक्ष्मी पंडित, मृदुला साराबाई, प्रमिला दंडवते आदी स्त्र्ायांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. १९६५ च्या हिंदुस्थानच्या विजयाचा इतिहास उलगडला आहे, दुर्गेश पुरळकर यांनी. जीएसटीबद्दलचे समज गैरसमज यावर अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी मार्मिक भाष्य केले आहे. याशिवाय बाळ फेंडके, डॉ. गिरीश दाबके, विंग कमांडर अशोक मोटे यांचे लेखन आहे.

संपादक ऋतावरी अवधूतशास्त्र तुळापूरकर

मूल्य ८० रु., पृष्ठ २००

पुण्यभूषण

पुण्याच्या इतिहास वर्तमानाचं आणि बदलत्या चेहऱया मोहऱयाचं प्रतिबिंब या अंकातून उमटतं. पुणेरी वाडे यामधून ‘नामशेष होत चाललेल्या संस्कृतीची कहाणी’ अविनाश सोहनी यांनी मांडली आहे. तर इतिहासाच्या पानांमधून या सदरामध्ये पुणे शहराचे वर्णन करणारा ना. वि. जोशी यांचा लेख वाचनीय आहे. पुण्याच्या प्रेमात पडलो, तो पडलोच हा  प्रसिध्द साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांचा लेख वाचताना  खूप मजा आणतो. पुण्याच्या सांस्कृतिक राजधानीचा कानोसा घेणारे दक्षिणी रसरंग, पुण्याच्या फॅशनविश्वाचा रनवे, आर्यभूषण – माहेरघर लोककलांच्या राणीचं, पुण्यातली वनचरी, पुणे कसे उद्योनगरी झाले आहे हे दाखवून देणारा वृषाली जोगळेकर यांचा ‘ पुणेकरांच्या जिवाभावाचे ब्रॅण्डस, पाळंदे कुरियर्स, एकबोटे फर्निचर्सचा धांडोळा घेण्यात आला आहे. पुण्याच्या लौकिकात भर घालणाऱया मान्यवर व्यक्तींवर विशेष लेख आहेत.

संपादक डॉ. सतिश देसाई

मूल्य १५० रु., पृष्ठs २०८

आपले छंद

आईसारखे दैवत या जगतावर नाही, हे सांगणारे लेख या अंकात आहेत. स्वामी गोविंद गिरी महाजांचा ‘मातृत्वाचा मंगल प्रवास’ उलगडणारा लेख आहे. हिंदुस्थानची आई असलेल्या गंगा नदीवर लिहिलेला भारत सासणे यांचा गंगेमध्ये गगन वितळले हा लेख गंगा मातेची अनेक वैशिष्टये उलडत जातो. राजन खान यांचा मी नाही लिहीत आईबद्दल हा लेख आईचे आयुष्यातील स्थान किती महत्वाचे आहे हे अधोरेखित करतो. रवी परांजपे यांचा माझी मातृभूमी काय होती… काय बनली… हा आपले देशाच्या सद्यस्थितीकडे लक्ष वेधतो. तर पीयुष पांडे यांचा आई वरील लेखामध्ये ते काळानुसार बदलत गेलेल्या आव्हानांनुसार ती कशी बदलत गेली हे स्पष्ट करतो.

संपादक दिनकर शिलेदार

मूल्य २५० रु., पृष्ठ  २२८

आरोग्य ज्ञानेश्वरी

‘असेच खा व छान जगा’ हा मूलमंत्र देत आरोग्य ज्ञानेश्वरी दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे. वाढत्या वयातील मुलांच्या आहारासंबंधी लेख वाचनीय आहे. ‘डाएटरी गाईडलाइन्स फॉर इंडियन्स’ या इंग्रजी पुस्तकातील शिफारसींचे भाषांतर वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. आपल्या देशात उच्च रक्तदाब या मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. हे रोग होऊ नयेत व झाले तर काय करावे याविषयी डॉ. राजेंद्र आगरकर यांनी नेटके मार्गदर्शन केले आहे. तसेच डॉ. विनायक हिंगणे यांचा मासिक पाळी, स्तनपान, ईसीजी या विषयी सोप्या भाषेत माहिती देणारा लेख आहे.

संपादक डॉ. हेमंत जोशी, डॉ. अर्चना जोशी/ डॉ. राजेंद्र आगरकर

मूल्य २०० रु., पृष्ठ १६०

गंधाली

यंदाचा हा दिवाळी अंक विविध विषयांची मेजवानी घेऊन वाचकांच्या भेटीला आला आहे. वसंत वाहोकार, अनघा तांबोळी, प्रा. प्रतिभा सराफ, राजेंद्र वैद्य, अशोक लोटणकर आदी मान्यवरांच्या कथा वाचनीय आहेत. प्राचार्य गोपाळराव मयेकर, प्राचार्य पु. द. कोडोलीकर, वर्षा रेगे यांचे लेखही वाचनीय आहेत. कवितेच्या समृद्ध दालनात कवी बर्नड लोपीस यांची ‘राट बोलवितॅ ’ या कवितचे ‘सामवेदी कादोडी’ या बोलीभाषेत केलेले रूपांतर व सिरियन अरबी भाषेतील कवयित्री मरम अल मसरी यांची ‘ग्लॅडिस’ ही कविता वेगळेपण दाखवणारी ठरली आहे.  सुरेखा कुलकर्णी यांचे ‘न्यूझीलंडचे दर्शन’ हे प्रवासवर्णन झकास आहे.

संपादक डॉ. मधुकर केशव वर्तक

मूल्य २०० रु., पृष्ठ २९६

आपली प्रतिक्रिया द्या