अजबच! ‘या’ देशात पुरुष ‘हिजाब’मध्ये राहतात अन् महिला लग्नानंतर परपुरुषाशी संबंध ठेवतात

जगातील प्रत्येक देशाची एक परंपरा आणि रितीरिवाज आहेत. काहींना काळानुसार या परंपरा बदलल्या, तर काही आजही या परंपरा पाळताना दिसतात. आज आपण अशाच एका देशाबाबत जाणून घेणार आहोत, जेथे पुरुषांना हिजाबमध्ये तर महिलांना बिनधास्त राहण्याची परवानगी आहे. शिवाय येथे लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही परपुरुषाशी सेक्स करण्याची महिलांना परवानगी आहे.

पश्चिम आफ्रिकेतील नायझर (Niger) या देशातील तुआरेग जातीच्या महिलांना आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याची परवानगी आहे. येथे महिला लग्नाआधीही पुरुषाशी संबंध ठेवू शकतात. मात्र पुरुषांना बुरख्यात रहावे लागते आणि कुठेही जाण्याआधी परवानगी घ्यावी लागते.

येथील परंपरेनुसार महिला आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही पुरुषाशी लग्न करू शकतात. एवढेच नाही तर लग्नानंतरही त्यांना एखादा पुरुष आवडला तर त्या पुरुषाशी देखील त्या संबंध ठेवू शकतात. महिलांच्या तुलनेमध्ये येथे पुरुषांवर अधिक बंधने आहेत. पुरुषांना आपला चेहरा लपवून फिरावे लागते.

एक असा देश, जिथं भरतो तरुणींचा ‘बाजार’, पैसे देऊन खरेदी केली जाते नवरी

तुआरेग समाजामध्ये महिला आपल्या पतीला कधीही सोडचिठ्ठी देऊ शकतात. घटस्फोट झाल्यानंतर येथे महिलेच्या माहेरचे लोक जल्लोष करतात. तसेच घटस्फोटावेळा महिला पतीकडून आपल्याला हवे ते मागू शकतात आणि पतीला ते द्यावेच लागते.

जगात महिलाही आहेत हे या ‘टारझन’ ला माहितीच नाही

तुआरेग समाजाची ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू असून आजही लोक याचे पालन करतात. वयात आलेल्या महिलेला आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य असते, तर पुरुषाला मात्र चेहरा लपवून आणि परवानगी घेऊन बाहेर जाण्याची सवय लावून घ्यावी लागते.

आपली प्रतिक्रिया द्या