केंद्र सरकारच्या विरोधात ममता बॅनर्जींकडून धरणे आंदोलन, विरोधी पक्षांचीही वादात ऊडी

पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता उध्वस्त करून सलग दुसर्यां दा मुख्यमंत्री विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी

सामना ऑनलाईन । कोलकाता

कोलकातामध्ये सीबीआयसोबत वादानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. रविवारी जेव्हा सीबीआयने चिटफंड घोटाळ्या प्रकरणी पोलीस कमिश्नर राजीव कुमार यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासासाठी पोहोचली तेव्हा कोलकाता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर हा वाद चिघळला.

सीबीआयकडे चौकशीसाठी कुठलेच कागदपत्र नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर सीबीआयने हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी कमिश्नर राजीव कुमार यांच्या घरी पोहचल्या. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारविरोधात धरणे आंदोलनाला सुरूवात केली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “देशात आणिबाणी पेक्षा वाईट स्थिती आलेली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना बंगालमध्ये सत्ता काबीज करायची आहे. दोघांनी मला अपमानास्पदक वागणूक दिली.” तसेच पोली कमिश्नर राजीव कुमार हे जगातले चांगल्या अधिकार्‍यांपकी एक असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या की, “ जर आपल्याला देश वाचवायचा असेल तर  आम्हाला नरेंद्र मोदी आणि भाजपला हटवले पाहिजे. फोर्सला संरक्षण देणे ही माझी जवाबदारी आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता पोलीस कमिश्नरच्या घरी येता, आमी सीबीआयच्या अधिकार्‍यांना अटक करू शकलो असतो परंतु तसे आम्ही केले नाही.”

या सगळ्या वादात विरोधी पक्षांनीही ऊडी घेतली असून त्यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला आहे. अखिलेश यादव  म्हणाले की “भाजप सरकार सीबीआयचा दुरूपयोग करत असून त्यामुळे संविधान आणि देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. ममता बॅनर्जींना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याच त्यांनी जाहीर केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही बॅनर्जी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असून त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच ते धरणे आंदोलनाला समर्थन देण्यासाठी कोलकातामध्येही येऊ शकतात. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीया ममता बॅनर्जी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

सीबीआयचे प्रभारी एम नागेश्वर म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच चीटफंड घोटाळ्याची चौकशी होत आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगाल सरकारने विशेष तपास पथक स्थापन केली होती. पोलीस कमिश्नर राजीव कुमार यांच्याकड्य सर्व पूरावे होते. त्यांनी सर्व पुरावे जप्त केले आहेत.” हे पुरावे सुपुर्द करण्यासाठी राजीव कुमार सीबीआयला सहकार्य करत नसल्याचे एम नागेश्वर यांनी म्हटले.

तर दुसरीकडे सीबीआयने राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे वेळ मागितली असून ते राज्यपालांशी याबाबात चर्चा करणात आहेत.