‘सबका साथ, सबका विकास’ नाही, तर ‘सबके साथ सर्वनाश’, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

1445

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील पंश्चिम बंगालमधील आंदोलन सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. तिसऱ्या दिवशीही हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. तसेच गृहमंत्री अमित शहा यांना देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी पाऊलं उचलण्याचे आवाहनही ममता बॅनर्जी यांनी केले.

तुम्ही (अमित शहा) फक्त भारतीय जनता पक्षाचे नेते नाही तर देशाचे गृहमंत्री आहात. कृपया देशामध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी पावलं उचला, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले. तसेच तुम्ही ‘सबका साथ आणि सबका विकास’ केला नाही, मात्र ‘सबके साथ सर्वनाश’ मात्र झालाय, अशी कडाडून टीका ममता बॅनर्जी यांनी केली. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी मागे घ्या. अन्यथा या कायद्याची राज्यात अंमलबजावणी कशी होते हे पाहतेच, असेही ममतादीदींनी सुनावले.

याआधी देखील ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रान उठवले. ‘मी जिवंत असेपर्यंत नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू होणार नाही’, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले. हा देश सर्वांचा आहे. जर सर्वांची साथ नसेल नाही तर सर्वांचा विकास कसा होईल? नागरिकत्व कायदा कोणासाठी आहे? असा सवाल उपस्थित करत ममता बॅनर्जी यांनी आम्हीही या देशाचे नागरिक आहोत असे म्हटले. सर्व धर्मांना एकत्र आणणे हा आमचा आदर्श आहे. आम्ही कोणालाही पश्चिम बंगाल सोडू देणार नाही. आम्ही निर्भिडपणे आणि शांततेने राहू, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या