ममतांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, ‘या’ विषयावर झाली चर्चा…

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंगाल निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांची नवी दिल्ली येथे ही पहिली बैठक होती.

या बैठकीनंतर ममता म्हणल्या आहेत की, त्यांनी पंतप्रधानांशी कोरोनापरिस्थितीबाबत चर्चा केली आहे. तसेच आपल्या राज्याला अधिक लस आणि औषधे देण्याबाबत चर्चा केली. यासोबतच बंगालमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत कमी लसी मिळतात असल्याचं देखील त्यांनी पंतप्रधानांना या बैठकी दरम्यान सांगितलं आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचं त्या म्हणल्या आहेत.

ममता बॅनर्जी म्हनल्यात आहेत की, पश्चिम बंगालचे नाव बदलण्याबाबतही चर्चा झाली आहे. यावर पंतप्रधान काय म्हणाले असं पत्रकारांनी त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, ‘पंतप्रधान काय म्हणाले, हे सांगणे योग्य ठरणार नाही. मात्र ते म्हणाले आहेत की, आम्ही पाहू.’

पेगॅसस प्रकरणी ममता म्हणाल्या, ‘पंतप्रधानांनी पेगॅसस विषयावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घ्यावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखालील चौकशीचा निर्णय घ्यावा.’ असे असली तरी याआधीच बंगाल सरकारने पेगॅसस प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आधीच दिले आहेत. दरम्यान ममता बॅनर्जी बुधवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या