तुम्ही हिंदुस्थानचे पंतप्रधान की पाकिस्तानचे अॅम्बेसेडर? ममता बॅनर्जी यांचा मोदींवर हल्ला

428

हिंदुस्थानची संस्कृती, परंपरा ऐतिहासिक आहे. असे असताना प्रत्येक बाबतीत पाकिस्तानशी बरोबरी कशाला करता? तुम्ही हिंदुस्थानचे पंतप्रधान आहात की पाकिस्तानचे अॅम्बेसेडर आहात? असे ठणकावत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी कर्नाटकात एका जाहीर सभेत बोलताना पाकिस्तानचा उल्लेख केला होता. त्या वेळी ते म्हणाले होते की, जे लोक हिंदुस्थानी संसदेविरोधात घोषणा देतात त्यांनी पाकिस्तानात होणाऱया अत्याचारांच्या विरोधातही घोषणा द्यायला हव्यात. त्यावर शुक्रवारी ममता बॅनर्जी उखडल्या.

आपली प्रतिक्रिया द्या