ममता तय्यार, सुवेंदूच्या गडातून लढणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी त्यांनी नंदिग्राममधून सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. नंदिग्राम हा अधिकारी यांचा राजकीय गड मानला जातो. येथेच सभा घेऊन त्यांनी भाजपला खुले आव्हान दिले.

50 हजार मतांनी हरवेन, नाहीतर राजकारण सोडेन – सुवेंदू अधिकारी

ममता बॅनर्जी यांच्या आव्हानाला माजी मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी प्रतिआव्हान दिले. मी नंदिग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जींना 50 हजार मतांनी पराभूत करेन, नाहीतर राजकारण सोडून देईन, असे प्रत्युत्तर अधिकारी यांनी दिले. त्यांनी ममता बॅनर्जी यांचा राजकीय गड असलेल्या दक्षिण कोलकात्ता येथे रोड शो घेऊन पलटवार केला.

आपली प्रतिक्रिया द्या