मला विधानसभेत जाण्यापासून रोखण्यात आलं, राज्यपालांचा खळबळजनक आरोप

3275

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरुच आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘मला तू चिज बडी है मस्त-मस्त’, असे म्हटल्याचा आरोप केलेल्या राज्यपालांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. ममतादीदींनी मला विधानसभेमध्ये जाण्यापासून रोखले, असा आरोप राज्यपालांनी केला आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी बाकी आहे. तत्पूर्वीच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसत आहे. अशातच राज्यपाल जगदीप धनखर यांनी गेल्या एक महिन्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मोर्चा उघडल्याचे दिसत आहे. दोघांमध्ये अधिकारांवरून जुंपली असून राज्यपाल ममतादीदींवर एकामागोमाग एक आरोप करत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मला ‘तू चीज बडी है मस्त-मस्त’ म्हटले, राज्यपालांचा आरोप

राज्यपालांनी आपल्या आरोपात म्हटले की, ‘पूर्वसूचना देऊनही विधानसभेचे तीन नंबरचे गेट बंद ठेवण्यात आले. सभागृहाचे कामकाज स्थगित असेल म्हणजे त्याचा अर्थ गेट बंद असावा असा होत नाही. राज्यपालांच्या प्रवेशासाठी असलेले प्रवेशद्वार बंद असणे ही लोकशाहीच्या इतिहासातील अपमानास्पद घटना आहे.’

‘तू चिज बडी है मस्त-मस्त’
गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आपल्यावर असभ्य भाषेत टीका केल्याचा आरोप राज्यपालांनी केला होता. ट्विटवरुन त्यांनी हे आरोप केले असून संविधान दिनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी माझ्यासाठी ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ असे शब्द वापरल्याचा दावा धनखर यांनी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या