पश्चिम विभागीय परिषदेची पणजी येथे 22 ऑगस्ट रोजी बैठक

373
amit-shah

पश्चिम विभागीय परिषदेची 24 वी बैठक 22 ऑगस्ट 2019 रोजी पणजी येथे होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत परिषदेचे उपाध्यक्ष या नात्याने बैठकीला उपस्थित असतील.

पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीसाठी गुजरात, महाराष्ट्र, आणि गोव्याचे मुख्यमंत्री तसेच दमण आणि दीव, दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासकीय प्रमुख, राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. यापूर्वीची बैठक गांधीनगर येथे 26 एप्रिल 2018 रोजी झाली होती.

1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्याने 1957 मध्ये पाच विभागीय परिषदांची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री हे या पाचही परिषदांचे अध्यक्ष तर संबंधित राज्याचे मुख्यमंत्री उपाध्यक्ष असतात. राज्यपाल आणखी दोन मंत्र्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करु शकतात. दर वर्षी एका विभागाला बैठकीच्या आयोजनाचा मान मिळतो. विभागीय परिषदेच्या बैठकीत केंद्र आणि राज्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करुन तोडगा काढण्यात येतो. राज्यांची हद्द, सुरक्षा, पायाभूत सुविधा जसे रस्ते, दळणवळण, उद्योग, पाणी आणि विद्युत, वने आणि पर्यावरण, गृहनिर्माण, शिक्षण, अन्न सुरक्षा, पर्यटन या समस्यांवरही उहापोह केला जातो.

आपली प्रतिक्रिया द्या