अन्न न चावता खाल्याने शरीरावर काय परिणाम होतात? वाचा…

भूक ही अशी संवेदना आहे की, समोर आलेल्या ताटात जे जेवण असतं ते एकदा कधी खातोय याची घाई सगळ्यांनाच होते. भुकेच्या तडाख्यात जेवण खाण्याची आपल्याला इतकी घाई असते की, ते आपण नीट चावून खातोय की नाही, याकडेही आपण लक्ष देत नाही.

आपल्या पैकी अनेकजण अन्न जेवताना घास नीट चावून खात नाहीत. काही लोक तर अन्न न चावता गिळूनही खातात. असे म्हणतात की एक घास 32 वेळा नीट चावून खावा. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.

अन्न नीट न चावता खाल्याने ‘हे’ गंभीर परिणाम होऊ शकतात

  • पोटदुखी आणि ॲसिडिटीचा त्रास.
  • अन्न नीट न चावता खाल्यास लठ्ठपणाचे प्रमाण वाढत जातं.
  • अन्न नीट पचन होत नाही.
  • बद्धकोष्टता, सारखे ढेकर येणं.
  • वय झाल्यावर सांधेदुखी, गुडघेदुखी असे त्रास होऊ शकतात.

म्हणूनच रोज नेहमीच अन्न नीट चावून खा. नाहीतर अश्या अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना निर्मला ठाकुर यांनी ही माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या