
चिया आणि सब्जाच्या बिया खूप लोकप्रिय आहेत. बहुतेक लोकं वजन कमी करण्यासाठी चिया आणि सब्जाच्या बिया वापरतात. चिया आणि सब्जाच्या बियांचे अनोखे फायदे आहेत. दोन्ही प्रकारच्या बियांमध्ये पोषक तत्त्वांचा साठा दडलेला असतो. दोन्ही बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे रोगप्रतिकार शक्ती, चयापचय वाढवते आणि वजन कमी करते. बऱ्याच जणांना चिया सिड्स आणि सब्जा या बिया सारख्याच वाटतात, कारण या दोन्ही बिया दिसायला सारख्याच असतात, मात्र नीट पाहिल्यास या दोन्ही बियांमध्ये थोडाफार फरक नक्कीच आहे. जाणून घेऊया, या बियांमधील पोषक तत्त्वे आणि फायद्यांविषयी…
चिया बिया…
चिया सीड्समध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि ते ग्लूटेन फ्री असते, म्हणजेच त्यामुळे ग्लुकोज वाढत नाही. तुम्ही ते सॅलडमध्ये मिसळून किंवा पुडिंग किंवा स्मूदी बनवून खाऊ शकता. 100 ग्रॅम चिया बियांमध्ये 486 ग्रॅम कॅलरीज असतात, तर 16.5 ग्रॅम प्रथिने, 42 ग्रॅम कर्बोदके, 3 ग्रॅम ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि 30 ग्रॅम निरोगी चरबी असतात.
यासोबतच चिया सीड्समध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात, ज्यामुळे कॅन्सरशी लढण्याची क्षमता वाढते. चिया बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते.
सब्जा बिया…
सब्जा बिया म्हणजे तुळशीच्या बिया. चिया बिया आणि सब्जाच्या बियांमध्ये जवळजवळ समान प्रमाणात कॅलरीज असतात. सब्जा बिया पाण्यात भिजवून खाल्ल्या जातात. त्यात तुळशीची थोडी चव चाखायला मिळेल. म्हणूनच तुम्ही ते कोणत्याही प्रकारच्या पेयात मिसळून पिऊ शकता. 13 ग्रॅम सब्जाच्या बियांमध्ये 60 कॅलरी ऊर्जा मिळते याशिवाय 2 ग्रॅम प्रथिने, 7 ग्रॅम कर्बोदके, 2.5 ग्रॅम हेल्दी फॅट, 3 ग्रॅम ओमेगा 3 फॅटी ऍसिड आढळतात. सब्जा बियांमुळे पचनशक्ती सुधारते. सब्जाच्या बियांमध्ये पेक्टिन आढळते, ज्यामुळे ते हार्मोन्स संतुलित राखण्यास मदत होते.
चिया सीड्स आणि सब्जा यामधील फरक
चिया सीड्समध्ये राखाडी, तपकिरी, पांढऱ्या आणि काळ्या रंगांचे मिश्रण असते. चिया सीड्स कधीही पूर्णपणे काळ्या दिसत नाहीत. या बियांचा आकार अंडाकृती असतो. सब्जाच्या बिया काळ्या रंगाच्या असतात. त्याचा आकार लहान आणि गोल असतो. अशा प्रकारे चिया सीड्स आणि सब्जा सीड्समध्ये फरक असतो.
आहारात कसा समावेश करू शकता?
चिया सीड्स पाण्यात भिजवून किंवा कच्चे खाऊ शकता. चिया सीड्ससाठी कोणत्याही वस्तू मिसळून खाऊ शकता. 30 ते 40 मिनिटे या बिया पाण्यात विरघळतात तसेच सब्जाच्या बिया भिजवल्याशिवाय खाता येत नाहीत. या बिया पाण्यात फार लवकर फुलतात. त्याची चव तुळशीच्या बियांसारखी असते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
चिया सीड्स आणि सब्जा या दोन्हींमध्ये पोषक तत्त्वे सारखीच असतात, मात्र वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स जास्त गुणकारी मानल्या जातात. वजन कमी करण्यासाठी सब्जाच्या बिया सब्जाच्या बियांवर फारसे संशो