खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळले नाही! चंद्रकांतदादा घसरले

14

सामना प्रतिनिधी । परभणी

रस्त्याकर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळले नाही, पाऊस झाला की खड्डे पडतातच, असे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज जणू या खड्डय़ातच घसरले. रस्त्यांवरील खड्डय़ांना त्यांनी काँग्रेस आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, या अगोदर महाराष्ट्राला भरीक निधी मिळाला नाही. त्यामुळे रस्ते जास्त टिकतील असे बनलेच नाहीत. तसेच छोटय़ा कंत्राटदारांमुळे रस्त्यांची अशी दुरवस्था झालेली आहे.

तथापि 15 डिसेंबपूर्वी सर्व खड्डे बुजविले जातील. आतापर्यंत रस्त्यांची कामे ही छोटय़ा कंत्राटदारांमार्फत करण्यात आली. या कंत्राटदारांनी तंत्रज्ञान वापरले नाही. केवळ बिले काढण्यापुरतीच कामे झाली. परिणामी राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली, असेही पाटील म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या