वयाच्या चाळिशीनंतर विमा खरेदी करताना…

आपला खर्च कितीही वाढला असला तरी कुटुंबासाठी विमा कवचाच्या माध्यमातून सुरक्षिततेचा लाभ घेण्यास कधीही उशीर होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. पण वयाची चाळिशी उलटून गेल्यानंतर विमा खरेदी करताना ग्राहकाने आपण निवडत असलेली विमा योजना आपल्या आर्थिक गरज पूर्ण करणारी आहे ना आणि आपल्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावर पुरेसे सुरक्षा कवच देण्यास सक्षम आहे की नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आयुर्विमा ही एक मूलभूत आर्थिक गरज आहे.  एखाद्याच्या आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला ठाऊक आहे की, दरवर्षी  ‘तरुण लोकसंख्या’ वाढतच आहे. ती अंदाजे 426 दशलक्ष आहे आणि एकूण हिंदुस्थानी लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण अंदाजे 34 टक्के आहे आणि एकूण मनुष्यबळाच्या तुलनेत अंदाजे 47 टक्के आहे. ही  पिढी आता 40  वयोगटाकडे वाटचाल करत आहे.  पुढील 10 वर्षांत या लोकसंख्येतील बहुसंख्य तरुणांनी चाळिशी गाठलेली असेल.  कोविड महामारीमुळे गेल्या 2 वर्षांत या पिढीमध्ये जागरूकतादेखील वाढली आहे. आतापर्यंत विम्याला विरोध करणाऱया अनेक व्यक्ती आता विम्याबद्दल चर्चा करण्यासाठी आणि  विमा खरेदी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

मुदत आयुर्विमा पॉलिसी 40 ते 45  या वयोगटातील व्यक्ती कमावणाऱया असतात. त्यांच्यावर कुटुंब अवलंबून असते. जबाबदाऱया असतात. एखाद्या व्यक्तीने आयुर्विमा पॉलिसी घेतलेली असेल, तर त्यांनीही पुनर्मूल्यांकन करणे,अतिरिक्त संरक्षण घेणे आवश्यक आहे.

अॅन्युइटी किंवा पेन्शन योजना वाढते आयुर्मान त्याचबरोबर उच्च राहणीमानाचा विचार केला, तर स्वतंत्रपणे पुरेसे पेन्शन नियोजन करणे अधिक महत्त्वाचे आहे. खरं तर पेन्शन किंवा अॅन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 40 हा वयोगट आदर्श आहे.

बचत योजना यूलीप आणि एन्डोन्मेंट योजना  मुलांसाठीच्या योजनांमध्ये लोकप्रिय आहेत.

अतिरिक्त लाभ ग्राहक गंभीर आजार, अपंगत्व आणि अपघाती मृत्यू यांसारख्या अतिरिक्त रायडर्ससह येणाऱया योजनादेखील घेऊ शकतात.

 विम्याची रक्कम ठरवणे हे एखाद्याच्या मानवी जीवन मूल्याच्या गणनेवर आणि विद्यमान विमा पॉलिसी तसेच गरजांवरदेखील अवलंबून असू शकते.

  –  पॅस्परस जे. एच क्रोमहौट, (व्यवस्थापकीय संचालक, श्रीराम लाइफ इन्शुरन्स)