व्हॉट्सअपवरील ब्लॉक नंबरहून मेसेज येत आहेत?, मग हे वाचा….

सामना प्रतिनिधी । मुंबई

व्हॉट्सअपवर काही दिवसांपूर्वी एक ब्लॅक डॉट कॉम नावाचा बग आला होता. ज्यामधील मेसेजला क्लिक केल्यावर युजरचं व्हॉट्सअप अकाउंट हँग होत होतं. काही युजर्सचे स्मार्टफोनही हँग झाल्याचे प्रकार समोर आले होते. आता व्हॉट्सअपमध्ये एक नवीन बग आल्याची माहिती समोर येत आहे. या नव्या बगमुळे व्हॉट्सअसपच्या युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्हॉट्सअपमध्ये हा बग आल्याने युजर्सना ब्लॉक केलेल्या नंबरवरूनही मेसेज येत आहेत. त्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअपला ब्लॉक केलेल्या व्यक्तीही तुमचं स्टेटस पाहू शकतो तसेच मेसेजही पाठवू शकतो.

व्हॉट्सअसपने या बगबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आणि ही समस्या सोडवली देखील नाही. या बगची तक्रार अॅन्ड्रॉईड आणि आयएसओ व्हर्जन वारणाऱ्या युजर्सनी केली आहे. व्हॉट्सअप युजरला कोणत्याही इतर युजरला ब्लॉक करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र व्हॉट्सअपच्या या बगमुळे ब्लॉक केलेले व्यक्तीही युजरला मेसेज पाठवू शकत आहेत. व्हॉट्सअपच्या या बगची समस्या ट्विटर आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे