WhatsAppमध्ये अचानक झाला ‘हा’ बदल, युझर्सचा तक्रारींचा पाऊस

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

WhatsApp आपल्या कोट्यवधी युझर्सला सातत्याने नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अनेकवेळा हे बदललेले फिचर युझर्सच्या डोक्याला तापदायक ठरतात. नुकतेच WhatsApp ने केलेल्या एका बदलानंतर युझर्सने तक्रारींचा पाऊस पडला आहे.

WhatsApp मधील एका बगमुळे युझर्सला प्रोफाईल नेम बदलण्यास अडचण येत असल्याचे समोर आले. प्रोफाईल नेमच्या पुढे एक किबोर्ड दिसत आहे, जो आधी दिसत नव्हता. आधी या जागी इमोजी (Emoji) हा पर्याय दिसत होता. याची माहिती युझर्सने ट्वीट करून कंपनीला दिली. युझर्सने स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे.

whatsapp-profile-name

दरम्यान, युझर्सच्या तक्रारींना उत्तर देताना WaBetaInfo सांगितले की कंपनीकडून कोणतेही नवीन फिचर देण्यात आलेले नाही. हे नवीन फिचर नाही तर बग आहे. तसेच हा बग सध्या कार्यरत केला नसून फक्त काही अॅड्रॉईड फोनमध्ये दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या