व्हॉट्सअॅपलाही सुरू करायची आहे पेमेंट बँक

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

गुगल तसेच इतर सोशल मीडियाकडून पेमेंट बँक सुरू केल्यानंतर आता देशातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सअॅप कंपनीला पेमेंट बँक सुरू करायची आहे. त्यासाठी देशातील शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय)कडून परवानगी मागितली आहे. पण, आरबीआयने अजूनही परवानगी दिलेली नाही.

दोन वर्षांपासून व्हॉट्सऍप पेमेंट बँक सुरू करण्याबाबत सरकारबरोबर चर्चा करत आहे. मात्र, या दरम्यान गुललने बाजी मारली असून त्यांनी ‘गुगल पे’ सुरू केली. त्यामुळे आता व्हॉट्सऍपचे प्रमुख क्रिस डॅनिअल यांनी आरबीआयने पेमेंट बँक सुरू करण्यासाठी पत्र लिहून परवानगी मागितली आहे.

व्हॉट्सअॅपचे काय म्हणणे आहे?
व्हॉट्सअॅपला भीम-यूपीआयबरोबर जोडून आम्हाला पेमेंट बँक सुरू करायची आहे. पेमेंट बँकेच्या माध्यमातून आम्हाला ग्राहकांना उपयुक्त आणि सुरक्षित अशी सेवा द्यायची आहे. त्यामुळे सरकारचे वित्तीय तसेच डिजिटल सक्षमीकरणाला मदत होऊन हिंदुस्थानींचे जीवन अधिक चांगले बनवण्याची संधी आम्हाला मिळेल, अशी आशा व्हॉट्सअॅपचे प्रमुख क्रिस डॅनिअल यांनी 5 नोव्हेंबरला पत्र लिहून सरकारला कळवले आहे.