व्हॉट्सअ‍ॅपने महिनाभरात बंद केली 18 लाख अकाऊंट्स

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपने महिनाभरात तब्बल 18.05 लाख हिंदुस्थानी युजर्सची खाती बंद केली आहेत. 1 ते 31 मार्च या कालावधीत कंपनीने ही कारवाई केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान 2021 कायद्याखाली ही कारवाई केल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. नुकताच कंपनीने मार्च महिन्याचा अहवाल जारी केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत ही आकडेवारी 4 लाखांहून अधिक आहे. फेब्रुवारीत तब्बल 14.26 लाख युजर्सची खाती बंद करण्यात आली होती.