व्हॉट्सअप- मेलवरून मागवा शेतातील ताजी भाजी, ठाण्याच्या महापौरांचा उपक्रम

1256

‘कोरोना’ विरुद्धचा लढा आता जोरात सुरू झाला असून लॉकडाऊनच्या काळात ठाणेकर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच जीवनावश्यक वस्तू वेळेवर मिळाव्यात यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला आहे. भाजीसाठी आता रस्त्यावर किंवा बाजारात न जाता थेट व्हॉट्सअप तसेच मेलवरून शेतातील ताजी भाजी नागरिकांना मागवता येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज पालिका मुख्यालयात करण्यात आला.

बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना थेट भाजीपाला त्यांच्या इमारतीपर्यत उपलब्ध करुन दिला जाणार आहे. शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महापौर नरेश म्हस्के यांच्या सहकायाने ठाण्यातील मी मराठी प्रतिष्ठान  व क्रक्स रिस्क मॅनेजमेंट प्रा.लि यांच्या माध्यमातून ठाणेकरांना शेतातील भाजी वाजवी दरात उपलब्ध होईल.

कमीत कमी तीनशे रुपयांची ऑर्डर
www.mmdcare.in  या वेबसाईटवर किंवा 9987736103 या व्हॉट्सअप क्रमांकावर नागरिकांनी आपल्याला हवा असलेला भाजीपाला व फळे यांची मागणी ऑनलाईन नोंदवावी. तसेच पैसेही ऑनलाईन भरता येणार आहेत. किंवा ऑर्डर आल्यानंतर पैसे देण्याची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांनी मागणी करताना कमीत कमी 300 रुपयापासून अधिकची मागणी नोंदवावी. मागणी नोंदविल्यापासून पुढच्या 48 तासात त्या ग्राहकाला भाजीपाला व फळे  उपलब्ध होणार आहेत.

दहा रुपयांचा निधी मुख्यमंत्री निधीला
या उपक्रमातून प्रत्येक ऑर्डरमागे 10 रुपयांचा निधी हा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला जाणार असून यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क  मोजावे लागणार नाही. या कामासाठी जे काम करणार आहेत, त्यांच्या  स्वच्छतेची काळजी तसेच त्यांना मास्क, हॅण्‌डग्लोज आदी सुरक्षेची उपकरणे उपलबध करुन दिली आहेत.

येथे संपर्क साधावा
अधिक माहितीसाठी डॉ. राजेंद्र पाटील 9420787197 व  विरेंद्र पाल 9820399044 या क्रमांकावर संपर्क साधावा. सध्याची परिस्थीती पाहता, ठाणेकरांनी घरी बसूनच आपल्याला लागणारा भाजीपाला व फळे मागवावीत, जेणेकरुन बाहेर पडण्याची गरज भासणार नसून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या