जगभर काही काळ बंद पडले व्हॉट्सअॅप

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानसह जगभर काही काळ व्हॉट्सअॅप बंद पडले होते. संदेशांची देवाणघेणाव करण्यात अडथळे येत असल्यामुळे युझर वैतागले आणि व्हॉट्सअॅप बंद पडल्याचे लक्षात आले. जवळपास तासभर व्हॉट्सअॅप जगभर ठप्प होते. व्हॉट्सअॅप बंद होण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. अनेक युझरनी फेसबुक, ट्विटर, इस्टाग्रामवर फोटो टाकून व्हॉट्सअॅप बंद पडल्याचे जाहीर करत नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर #whatsappdown असा हॅशटॅग ट्रेंड झाला.

व्हॉट्सअॅप बंद पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी सप्टेंबरमध्येही अशाच प्रकारे व्हॉट्सअॅप ठप्प झाले होते. दरम्यान, काही वेळेपासून ठप्प झालेले व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू झाले आहे. आता मेसेजही सेंड आणि रिसिव्ह होत आहेत, अशी माहिती काही युझरनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या