व्हॉटस्ऍपचा ग्रूप अॅडमिन झाला पॉवरफुल

सामना प्रतिनिधी । मुंबई

जगातील सर्वाधिक लोकप्रिय मॅसेंजिंग अॅप व्हॉटस्अॅपने ग्रुप चॅटिंगसाठी पाच नवे फिचर आणले आहेत. ग्रुप डिस्क्रिप्शन, अॅडमिन कंट्रोल, ग्रुप कॅच अप, पार्टीसिपेंट सर्च आणि अॅडमिन परमिशन्स असे हे फिचर आहेत. यामुळे व्हॉटस्अॅपचा ग्रुप अॅडमिन अधिक पॉवरफुल झाला आहे.

वॉटस्अॅपच्या नवीन फिचरमध्ये ग्रुप बनवणारा अॅडमिन त्यांच्या ग्रुपचे वर्णनही देऊ शकतो. इतर सदस्यांना तसे करण्याची अनुमती देऊ शकतो. किंवा ग्रुपची माहिती कुणी द्यायची नाही याचे नियंत्रणही अॅडमिनच्या हाती राहील. नव्या अपडेटमुळे व्हॉटस्अॅप युजर्सकडे कायमस्वरूपी गुप सोडण्याचा पर्याय असेल. त्यामुळे ग्रुप सोडल्यानंतरही वारंवार अॅड करण्याच्या त्रासापासून युजर्सची सुटका होईल. याशिवाय ज्या युजरने ग्रुप तयार केला आहे त्याला ग्रुपमधून काढता येणार नाही. नव्या अपडेटमुळे ग्रुपवरील कोणताही मॅसेज शोधणे युजर्सला शक्य होईल.