व्हॉट्सअॅपने केलं स्टेटस ‘अपडेट’

42

सामना ऑनलाइन । मुंबई

व्हॉट्सअॅप युजर्स दरवेळी आपलं स्टेटस अपडेट करत असतात. आता दस्तुरखुद्द व्हॉट्सअॅपनेच आपलं स्टेटस अपडेट केलं आहे. नुकतेच व्हॉट्सअॅपने अॅप्लिकेशनमध्ये नवीन फीचर्स आणले आहेत. आतापर्यंत फक्त काही शब्दांपुरतं मर्यादित असणारं व्हॉट्सअॅप स्टेटस आणखी आकर्षक झालं आहे. या नवीन फीचरद्वारे युजर्स फोटो, व्हिडीओ किंवा जीआयएफ फाइल आपलं स्टेटस म्हणून ठेवत आहेत. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप युजर्स आपले प्रत्येक क्षण स्टेटस अपडेट करून मित्रांसोबत शेअर करत आहेत.

काय आहे हे नवीन फीचर-
* यापूर्वी फक्त काही शब्द आणि इमोजी यातूनच आपल्या भावना युजर्सना व्यक्त करता येत होत्या. मात्र, आता या स्टेटस फीचरच्या बदललेल्या रुपात तुम्ही फोटो किंवा व्हिडीओही शेअर करू शकता.
* अपडेटेड फोटोसह तुम्ही त्यात एखादा संदेशही लिहू शकता. फोटो किंवा व्हिडीओ ठेवायचा नसेल तर, सध्या हिट असलेल्या जीआयएफ फाइल्सही तुम्हाला ठेवता येतील. जेणेकरून तु्म्ही तुमचं स्टेटस आणखी गमतीदार करू शकाल.
* फेसबुकप्रमाणेच तुमच्या स्टेटससाठी काही प्रायव्हसी सेटिंग्ज देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र मेन्यूही देण्यात आला आहे. तुमचं स्टेटस कोणी पाहावं किंवा पाहू नये, हे तुम्हाला ठरवता येईल. तुमचं स्टेटस पाहून तुमचे मित्र त्यावर कंमेट्सही करू शकणार आहेत. शिवाय स्टेटस बदलण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाण्याची गरज नाही. चॅट आणि कॉल्ससारखा स्टेटस हा एक नवीन टॅबही यात समाविष्ट करण्यात आला आहे.
* स्टेटस टॅबमध्ये अनेक ग्रुप दिसत आहेत. इथे ‘माय स्टेटस’ मध्ये जाऊन युजर्स ताजे व्हॉट्सअॅप स्टेटस पाहू शकतात. इथे स्वाइप केल्यानंतर युजर्सचे हे स्टेटस कोणी-कोणी पाहिले आहे, हेही त्यांना सहज कळू शकेल. इथेच दुसरा पर्याय आहे, ‘रिसेंट अपडेट्स’चा. यात युजर्स मित्रांचे मागील २४ तासांतील स्टेटस पाहू शकतात. याव्यतिरिक्त ‘व्हूव्ड अपडेट्स’, ‘म्युटेड अपडेट्स’ देखील पाहू शकतात. युजरने एकदा स्टेटस डिलिट केलं की, ते त्याच्या मित्रांच्या ‘रिसेंट अपडेट्स’मधूनही निघून जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या