‘व्हॉट्सऍप’ची प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट न केल्यास अकाउंट डिलीट होणार? जाणून घ्या सत्य

युजर्सची वाढती नाराजी आणि त्यांचा इतर मेसेजिंग अॅप्सकडे वाढलेला ओढा यामुळे ‘व्हॉट्सअॅप’ने प्रायव्हसी पॉलिसीसाठी दिलेली 15 मेची डेडलाइन रद्द केली आहे. ही पॉलिसी न स्वीकारणाऱ्या युजर्सची अकाऊंट डिलीट करण्याचा इशारा व्हॉट्सअॅपने दिला होता. परंतु डेडलाइनच रद्द केल्याने आता पुढील निर्णयापर्यंत अकाऊंट सुरूच राहणार आहेत.

15 मेपासून कोणतेही अकाऊंट डिलीट केले जाणार नाही आणि नव्या पॉलिसीबाबतचे रिमाइंडर्स पुढच्या काही आठवडय़ांमध्ये पाठवले जातील असे व्हॉट्सअॅपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जगभरात व्हॉट्सअॅपचा मोठा चाहता वर्ग आहे. हिंदुस्थानात तर हे प्रमाण प्रचंड आहे. त्यांना अधिकाधिक चांगली सेवा देता यावी यासाठी व्हॉट्सअॅपकडून वेळोवेळी नवीन बदल केले जात असतात.

गेल्या जानेवारीमध्ये व्हॉट्सअॅपने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केले. ती पॉलिसी अॅक्सेप्ट करण्यासाठी 8 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. त्याला युजर्सचा प्रतिसाद न लाभल्याने ती 15 मेपर्यंत वाढवण्यात आली. ही पॉलिसी अॅक्सेप्ट केली तर आपली खासगी माहिती, संभाषण, कॉल्स याची माहिती उघड होईल अशी भीती युजर्समध्ये निर्माण झाली आहे. तसेच या पॉलिसीमुळे माहिती– तंत्रज्ञान अधिनियमाचेही उल्लंघन होत असल्याची याचिका पेंद्र सरकारने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या