व्हॉट्सअपचा सेंन्ड मेसेज करता येणार एडिट किंवा डिलीट

13

सामना ऑनलाईन । मुंबई

व्हॉट्सअॅपवर कधी-कधी चुकीचा मेसेज चुकीच्या व्यक्तीला जातो, त्यानंतर तो मेसेज डिलिटही करता येत नाही. ही गरज लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने एक नवीन ‘रिव्होक’ फीचर आणले आहे. हे फीचर आयओएस प्रणालीवर चालणाऱ्या व्हॉट्सअॅपवर दिसत आहे. ज्यामध्ये युजरला पाठवलेला मेसेज एडीट किंवा डिलीट करता येणार आहे. सध्या या फीचरची टेस्टिंग सुरू आहे.

या फीचरमुळे पाठवलेला मेसेज ५ मिनिटांच्या आत डिलीट करता येणार आहे. याशिवाय व्हॉट्सअप युजरसाठी ‘रिव्होक बटन’देखील उपलब्ध होणार आहे. कदाचित हे फीचर त्यावेळी काम करेल ज्यावेळी रिसिव्हरने तुमचा मेसेच वाचला नसेल. मात्र हे फीचर युजर्ससाठी कधी उपलब्ध करून दिले जाईल याबाबत कोणतीही माहिती व्हॉट्सअॅपने अद्याप दिलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या