व्हॉट्सअॅपचं जुनं स्टेट्स फीचर परत येणार

30

सामना ऑनलाईन ।

व्हॉट्सअॅप युझर्ससाठी एक खुशखबर आहे. ही खुशखबर नवीन काहीतरी येतंय म्हणून नाही तर जुनंच परत येणार म्हणून आहे. व्हॉट्सअॅप आपलं जूनं टेक्स्ट स्टेटस फीचर पुन्हा एकदा आणत आहे. व्हॉट्सअपच्या नवीन अपडेटेड अॅपमध्ये स्टेटस फीचर बदलल्यामुळे युझर्सनं सोशल मीडियावर मोठी नाराजी व्यक्त केली होती.

नवीन स्टेट्स फीचरमध्ये फोटो आणि व्हिडिओसह टेक्स्ट टाकण्याची सोय करून देण्यात आली होती. मात्र बऱ्याच लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. नवीन स्टेट्स २४ तासांत गायब होत असल्यानं व्हॉट्सअॅपनं जुनं टेक्स्ट फीचर पुन्हा आणण्याचा निर्णय घेतला आहे.

जूनं टेक्स्ट स्टेटस फीचर वापरण्यासाठी सेटिंग मेन्यूमध्ये जावं लागेल. यानंतर प्रोफाईल फीचरखालीच हे स्टेटस फीचर दिसेल. यावर क्लिक केल्यास युझर्सना स्टेटस बदलता येईल. पूर्वीप्रमाणेच यात काही डिफॉल्ट ऑप्शन दिसतील, जसे की Available, Busy, At school, At the movie, Sleeping Etc. महत्त्वाचं म्हणजे जुन्या टेक्स्ट स्टेटससोबत नवं स्टेटस फीचरही कायम राहील. फक्त नव्या फीचरचं नाव About असेल. त्यामुळे युझर्सना आपल्या आवडीनुसार पर्याय निवडता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या