
व्हॉट्सअप युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअपने पुन्हा एकदा नवीन फिचर सादर केले आहे, याबाबतीत कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्गने माहिती दिली आहे. व्हॉट्सअपच्या या नव्या फिचरने युजर्स आपल्या कस्टमाइज्ड ‘डिजिटल अवतार’ क्रिएट करु शकतो. व्हॉट्सअपचे हे फिचर फेसबुक आणि इंस्टाग्राम अॅप युजर्ससाठी आधीपासूनच उपलब्ध असले तर व्हॉट्सअॅपवर चॉटिंग दरम्यान मजेदार स्टिकर्स वापरता येतील.
व्हॉट्सअप युजर आपल्या कस्टमाइज्ड डिजिटल अवताराला कस्टमाइज करु शकता. याचबरोबर आऊटफिट, हेअरस्टाईल आणि चेहऱ्याचे फिचर्सचे कॉम्बिनेशन निवडू शकता. रिपोर्टनुसार, नव्या व्हॉट्सअप अवताराला प्रोफाईल फोटो प्रमाणेही वापरता येऊ शकते.
व्हॉट्सअप युजर्सजवळ अवतार अॅक्शन आणि इमोशनमधून 36 कस्टम स्टिकर्समधून निवडण्याचा पर्याय असेल. अवतार तयार झाल्यानंतर, व्हॉट्सअॅप वापरकर्ते ते त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करू शकतात.
व्हॉट्सअप अवतार फीचरला युजर्ससाठी जारी केले आहे, कंपनी ते टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करते. या कारणामुळे सर्व डिवाईसवर एकत्र हे फिचर उपलब्ध होत नाही. जेव्हा या फिचरला तपासले त्यावेळी व्हॉट्सअॅप आमच्यासाठी व्हॉट्सअॅप आयओएस आणि अॅण्ड्रॉईडसाठी उपलब्ध आहे.
याचा वापर करणे सहज सोपे आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये जाऊन स्टिकर ऑप्शनमध्ये जावे लागेल. अॅण्ड्रॉईडमध्ये त्यासाठी चॅटबॉक्समधील इमोजीच्या सिम्बॉलमध्ये टॅप करावे लागेल. तर iOS मध्ये स्टिकरचा पर्याय चॅट बॉक्समध्येच असतो.
यानंतर तुम्हाला अवतारांच्या पर्यायावर जाऊन नवीन अवतार तयार करावा लागेल. यामध्ये तुम्ही हेअर स्टाइल, फेशियल आणि इतर पर्याय कस्टमाइज करून अवतार तयार करू शकता. अॅप अधिक वास्तववादी अवतारासाठी फ्रंट कॅमेरा देखील वापरेल. अवतार तयार केल्यानंतर, तो जतन करा.