आयफोनची ‘सिरी’ व्हॉट्सऍप मेसेज वाचणार

54

सामना ऑनलाईन । मुंबई

ऍपल आयफोनवरील ‘सिरी’ ही वॉईस असिस्टंट सिस्टिम ऍपल युझर्सना आता व्हॅट्सऍपवरील मेसेजेस वाचून दाखवणार आहे. लवकरच ऍपल युझर्सना आयओएस १०.३ हे अपडेट मिळणार आहे. सिरी व्हॉइस असिस्टंट मेसेज वाचून दाखविण्याबरोबरच मेसेजला रिप्लाय करण्यासही मदत करणार आहे. ऍपलच्या मोबाईल, आयपॅडसह आयपॉडवर सिरी ऍप्लीकेशन कार्यान्वित असून सिरीला आज्ञा देऊन युझर त्यावर मेल ओपन करणे, कॉल लावणे, इंटरनेटवर एखादे संकेतस्थळ सुरू करणे आदी कामे करता येतात.

आपली प्रतिक्रिया द्या