या अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय भुवनेश्वर कुमारचं नाव

26

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आपण नेहमीच हिंदुस्थानी क्रिकेटपटू आणि त्याच्या गर्लफ्रेंडबाबतच्या अनेक बातम्या ऐकत असतो. कधी कधी केवळ त्याबाबत अफवाच असतात तर कधी त्याबद्दलचे फोटो हे सोशय मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये हिंदुस्थानचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा देखील समावेश आहे. भुवनेश्वर कुमारचं नाव तामीळ चित्रपट अभिनेत्री अनुस्मृति सरकार हिच्यासोबत जोडलं जात आहे.

भुवनेश्वर कुमारने मे २०१७ मध्ये इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत त्याच्यासमोर कोण मुलगी होती हे स्पष्ट झालं नाही मात्र त्याच्या चाहत्यांनी याबाबत कल्पना करायला सुरुवात केली. भुवनेश्वरने आपल्या फोटो कॅप्शनमध्ये ‘डिनर डेट. मी लवकरच संपूर्ण फोटो पोस्ट करेन’ असं लिहिलं होतं.

फोटो टाकल्यावर एका आठवड्यानंतर भुवनेश्वर एका मुलीसोबत कारमधून फिरताना सुध्दा दिसला होता. काही वृत्तपत्रात भुवनेश्वर आणि तामीळ चित्रपट अभिनेत्री एकमेकांना भेटत असल्याच्या बातम्या होत्या. मात्र भुवनेश्वरने इन्स्टाग्रामवर “जेव्हा माझं कोणत्या मुलीशी अफेअर असेल तर मी स्वतः सर्वांना त्याबाबत सांगेन” असं म्हणत त्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी भुवनेश्वरवर लग्नासाठी दबाव टाकलेला नाही. भुवनेश्वरने या क्षणी खेळावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असं घरच्यांचं मत आहे. तसंच कोणाशी लग्न करायचं हा त्याचा वैयक्तिक निर्णय असेल असं ही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या