चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री भरकटली; सहअभिनेत्रीचे घेतले चुंबन

चित्रपट हे कलेच्या सादरीकरणाचे प्रभावी माध्यम आहे. तसेच या क्षेत्रातील कलाकराकडे प्रसिद्धीचे वलय असते. त्यामुळे त्यांनी केलेली एखादी घटनाही चर्चेचा विषय ठरते. तसेच एखादी भूमिका साकारताना अभिनेते त्या भूमिकेशी समरस होतात. अनेकदा त्या भूमिकेत शिरल्याने ते चित्रपटाच्या मूळ कथानकापासून भरकटतात. मात्र, त्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेली ही अदाकारी प्रेक्षकांना भावते. मात्र, एक अभिनेत्री चित्रीकरणादरम्यान भरकटली आणि तिने सहअभिनेत्रीला घट्ट मिठी मारत तिचे चुंबन घेतले. त्यामुळे सहअभिनेत्रीही चक्रावली होती.

चित्रपटात आपला प्रभाव दाखवण्यासाठी अनेक अभिनेत्री बोल्ड सीन देतात. कथानकाच्या गरजेप्रमाणे स्वतःची अभिनय शैली बदलत वजन कमी- जास्त करणे अशा अनेक प्रकारे ते भूमिका साकारण्यासाठी मेहनत घेत असतात. मात्र, चित्रीकरणादरम्यान एका भूमिकेशी समरस झाल्याने अभिनेत्री भरकटल्याची घटना अमेरिकेत 2013 मध्ये घडली होती. त्याची खूप चर्चा रंगली होती.

डेव्हिल रसेल यांच्या अमेरिकन हस्टल चित्रपटाच्या एक दृश्याच्या चित्रीकरणावेळी अशीच घटना घडली होती. चित्रीकरणादरम्यान सेटवरील सर्वांना आश्चर्यचकीत करत जेनिफर लॉरेन्स या अभिनेत्रीने सहअभिनेत्री अमी एडम्सला घट्ट मिठी मरत तिचे चुंबन घेतले. दरम्यान कथानकात किंवा त्या सीनमध्ये असा कोणताही उल्लेख नसल्याने सर्वांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्रींचे संबंध तणावाचे होते. त्यांच्यातून विस्तवही जात नसताना जेनिफरने केलेल्या या घटनेची चर्चा होती. तसेच हा सीनही खूप लोकप्रिय झाला होता.

चित्रपटात जेनिफर क्रिस्टल बेलची पत्नी असते. तर एमी एडम्स त्याची प्रेयसी असते. चित्रपटातही जेनिफर आणि एमी यांचे संबंध तणावाचे दाखवले आहेत. एमी यांनी दिग्दर्शक डेव्हिड रसेल यांच्याशी दृश्याबाबत चर्चा करून त्यांच्याकडून ते समजून घेतले होते. या दृश्यात आमच्या दोघींमधला तणाव आणि भावना व्यक्ती करण्यासाठी आम्ही एकमेकांचे चुंबन घेतले तर दृश्य परिणामकार होईल, अशी सूचना एमी यांनी केली. त्यावेळी डेव्हिड यांनी ही सूचना हसण्यावरी नेत तुमच्या दोघींचे संबंध आणि केमस्ट्री बघता ते शक्य नसल्याचे सांगितले.

डेव्हिड यांनी गंमत म्हणून ही कल्पना जेनिफरलाही सांगितली. जेनिफरनेही ती गंमत म्हणून ऐकली आणि सोडून दिली. त्यामुळे हे शक्य नसल्याचे डेव्हिड समजून चुकले. मात्र, प्रत्यक्षाच चित्रीकरणावेळी भावनात्मक गुंतागुत व्यक्त करत जेनिफरने जबरदस्त अभिनय केला. या सीनच्या शेवटी मनातील गुंतागुंत आणि भावना यांच्या प्रभावाने जेनिफर भूमिकेत शिरली होती. त्यावेळी अचानक तिने एमीला घट्ट मिठी मारत तिचे चुंबन घेतले. त्यामुळे हे दृश्य खूप प्रभावी झाले. तसेच या दृश्याची खूप चर्चाही झाली.

या दृश्याच्या चित्रीकरणावेळी मी भूमिकेशी एकरूप झाले होते. कथानकात आणि वास्तवात आमचे तणावाचे संबंध आणि डेव्हिड यांनी गंमत म्हणून सांगितलेली सूचना माझ्या मनात घोळत होती. त्यामुळे हे दृश्य प्रभावी करण्यासाठी आपण भारावलो गेलो. आमच्यातील कटूपणा संपवण्याची इच्छा मनात आली आणि त्याच भावनेने मी एमीला घट्ट मिठी मारत तिला चुंबन दिल्याचे जेनिफरने सांगितले. या दोघीही हॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांच्यातील संबंध, त्यांची केमिस्ट्री आणि या दृश्याची खूप चर्चा झाली होती.