न्यूझीलंडमध्ये आम्ही 3 दिवसांत हरलो तेव्हा कुणी बोलले नाही? खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना कोहलीचे उत्तर

अहमदाबाद येथील तिसरी कसोटी दोन दिवसाच्या आतच संपुष्टात आली. फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या दिवस-रात्र कसोटीतील खेळपट्टीवर इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी टीका केली. याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला टीकाकारांना चोख उत्तर देताना म्हटले की, न्यूझीलंडमध्ये आम्ही तीन दिवसांत हरलो तेव्हा कुणी बोलले नाही. तेव्हा आमच्या फलंदाजांच्या तंत्रावर पराभवाचे खापर फोडले. वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीला कोणी दोषी ठरवले नाही. काही व्यक्ती चेंडू व खेळपट्टीवर फोकस का करतात हेच समजत नाही. कोणताही संघ जिंकण्यासाठी मैदानात उतरतो. तो विजय मग कितीही दिवसांमध्ये मिळो.

 दोन्ही संघांतील फलंदाजांना तिसऱ्या कसोटीत निराशेचा सामना करावा लागलाय. फलंदाजांनी या खेळपट्टीवर कौशल्य दाखवायला हवे होते. प्रत्यक्षात ते झाले नाही. त्यामुळे खेळपट्टीला दोष देणे चुकीचे आहे. आता आमचा फोकस खेळपट्टीवर नाहीए. स्वतःला मजबूत करण्याकडे आहे, असे स्पष्ट मत विराट कोहली याने यावेळी व्यक्त केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या