कुठे गेली मोदींची मावशी?

109

सामना ऑनलाईन, पंढरपूर

भाजप सरकार गेल्या ३ वर्षांत अपयशी ठरले असून वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेले भाव पाहून सध्या मी भाजपच्या जाहिरातीमधील मावशीचा शोध घेत आहे. त्यावेळी महागाईबाबत आवाज उठवणारी भाजपची मावशी आता कुठे गेली, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. त्यावर सोशल मीडियात सुळे यांच्या या विधानाला जोरदार पाठिंबा मिळत आहे. काहींनी तर ‘मोदींची मावशी गेली कुठे?’ अशी विचारणाही केली.

‘अच्छे दिन’चे गाजर वाटप करून सत्तेवर आलेल्या भाजपला निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला असावा असे चित्र सध्या देशभर दिसत आहे. या काळात भाजपने केलेल्या जाहिरातींचे आता करायचे तरी काय, असा सवाल संतप्त आणि संत्रस्त जनता करीत आहे. पेट्रोल-डिझेलचा भडका उडालाय, गॅस महाग झालाय, भाजीपाला कडाडलाय, शेतकऱयांच्या आत्महत्या सुरूच आहेत… मग बदलले तरी काय, असा प्रश्न सामान्य माणसाला पडलाय. कुठे गेली ती भाजपची मावशी, असा सवाल विरोधी पक्ष करतोय, तर कुठे गेले ते कसमें वादे… ही फसवणूक झाल्याची भावना जनतेच्या मनात खदखदत आहे.

  • प्रत्येक भाजी आणि फळांसाठी किलोमागे १०० ते १२० रुपये
  • पेट्रोल ७९ रु. लिटर,डिझेल ६३ रु. लिटर,घरगुती गॅस सिलिंडर५७६ रुपये
  • महाराष्ट्र-जानेवारी ते मे १,१२९ शेतकऱयांच्या आत्महत्या; हिंदुस्थानात दरवर्षी १२ हजार
आपली प्रतिक्रिया द्या